भिवंडीत हुक्का पार्लरवर कारवाई ; वीस जणांविरोधात गुन्हा दाखल....
By नितीन पंडित | Updated: March 18, 2024 16:35 IST2024-03-18T16:35:36+5:302024-03-18T16:35:58+5:30
शहरातील फुले नगर क्रमांक एक येथे एका बंद पडलेल्या यंत्रमाग कारखान्यात अरविंद वंजारी यांचा अनधिकृत हुक्का पार्लर सुरू आहे.

भिवंडीत हुक्का पार्लरवर कारवाई ; वीस जणांविरोधात गुन्हा दाखल....
भिवंडी:भिवंडी पोलीस उपायुक्त परिमंडळ क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत हुक्का पार्लर सुरू असून एका हुक्का पार्लरवर रविवारी पोलिसांनी कारवाई केली आहे.
शहरातील फुले नगर क्रमांक एक येथे एका बंद पडलेल्या यंत्रमाग कारखान्यात अरविंद वंजारी यांचा अनधिकृत हुक्का पार्लर सुरू आहे. तेथे हुक्का पार्लर चालक आपल्या चार कामगारांच्या मार्फत रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास हुक्का पिण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना तंबाखु मिश्रीत फ्लेवरचा हुक्का पिण्यासाठी उपलब्ध करून देत असतांना आढळून आल्याने भिवंडी शहर पोलिसांनी या पाच जणांसह हुक्का पिण्यासाठी आलेल्या १५ ग्राहकां विरोधात प्रतिबंधित कारवाई करीत तेथील १८ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत सर्वांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.