भिवंडीत २३ लाखांच्या बार्ज व सक्शन पंम्पवर महसूल विभागाची कारवाई
By नितीन पंडित | Updated: April 6, 2024 17:54 IST2024-04-06T17:53:59+5:302024-04-06T17:54:19+5:30
याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिवंडीत २३ लाखांच्या बार्ज व सक्शन पंम्पवर महसूल विभागाची कारवाई
नितीन पंडित, भिवंडी: पिंपळास खाडीपत्रात अवैध रेती उपसा करण्याच्या तयारीत असलेल्या बार्ज व सक्षम पंपावर स्थानिक नागरिकांच्या मदतीने महसूल विभागाने कारवाई केल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सुमारे २३ लाखांचे बार्ज व सक्षम पंप खाडीपात्रात बुडविण्यात आले आहेत.
सब अजगर शेख वय ३२ वर्ष रा. झारखंड, रफू बशीर शेख वय २५ वर्ष रा. पश्चिम बंगाल, काळू मीनाझर शेख वय १९ वर्ष रा. झारखंड असे अवैध रेती उपसा प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. या तिघांनी पिंपळस खाडीपात्रात अवैध रेत उपसा करण्यासाठी बार्ज व सक्शन पंप घेऊन गेले असता पिंपळास गावातील गावकरी सुनील सिताराम पाटील, प्रकाश बेडक्या पाटील, बंडू दशरथ पाटील, बाळा गोपीनाथ म्हात्रे यांनी अवैध रेती उपसा करण्यासाठी आलेले सेक्शन पंप अडवून धरले होते यानंतर या संदर्भातील माहिती महसूल विभाग व पोलीस यंत्रणेला देतात महसूल विभागाचे भास्कर पाटील यांनी १५ लाख रुपये किमतीचा बार्ज व ८ लाख रुपये किमतीचे सक्षन पंप असं ऐकून २३ लाख रुपयांचा मुद्देमाल पाण्यात बुडवला व या प्रकरणी तिघा जणांविरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.