ठाण्यात बारवर बुलडोझर, नौपाड्यातील तीन, उपवन येथील एका बारवर कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 06:21 PM2017-09-27T18:21:45+5:302017-09-27T18:22:12+5:30

Action on a bar at Buldozar, three in Naupada, on the Thane in Thane bar | ठाण्यात बारवर बुलडोझर, नौपाड्यातील तीन, उपवन येथील एका बारवर कारवाई 

ठाण्यात बारवर बुलडोझर, नौपाड्यातील तीन, उपवन येथील एका बारवर कारवाई 

Next

ठाणे - महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शहरातील अनधिकृत बार, लाऊंज बार आणि हुक्का पार्लर यांच्यावर तीन दिवसात कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर आज नौपाड्यातील तीन आणि उपवन येथील एका बारवर जोरदार कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये नौपाडा प्रभाग समितीमधील शिल्पा, अॅंटीक पॅलेस, पुष्पा विहार तर उपवन येथील सूर संगीत बारवर कारवाई करण्यात आली. दरम्यान कोठारी कंपाऊंडमधील अनधिकृत बार, लाऊंज बार आणि हुक्का पार्लर्सना अग्निशमन विभाग, शहर विकास विभाग आणि ३७६(अ) अन्वये नोटीस देण्याची कार्यवाही करण्यात आली. 
          आज सकाळपासून पोलिस बंदोबस्तात आराधना टाॅकीज समोरील तळ अधिक एक मजल्याचे बांधकाम असलेल्या शिल्पा बारवर कारवाई करण्यात आली. यावेळी अतिक्रमण निर्मूलन पथकाने शिल्पा बारमधील बोकायदा करण्यात आलेले त्याचप्रमाणे अंतर्गत बदल करून केलेले बांधकामही तोडून टाकण्यात आले.
त्यानंतर तीन पेट्रोल पंप येथील बहुचर्चित ॲंटीक पॅलेस बारवर अतिक्रमण विभागाने आपला मोर्चा वळविला. तळ अधिक १ मजली बांधकाम असलेल्या या बारमधील कारवाईत टेरेसवर बांधण्यात आलेले पत्र्याचे शेड, आणि अंतर्गत फेरबदल करून मोठ्या प्रमाणात करण्यात आलेले सर्व बांधकाम, फर्निचर तोडून टाकण्यात आले. 
 त्याचबरोबर वंजना टाॅकीज येथील पुष्पा विहार बारवर कारवाई करून विनापरवाना केलेले अंतर्गत बांधकाम तोडण्यात आले. दरम्यान कोठारी कंपाऊंडमधील अनधिकृत बार, लाऊंज बार आणि हुक्का पार्लर्सना नोटीस देण्याची कार्यवाही करण्यात आली. त्याचबरोबर उपवन येथील सूर संगीत बारवरही कारवाई करण्यात आली.  सदरची कारवाई उपायुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, सहाय्यक आयुक्त मारूती गायकवाड, डाॅ. चारूशीला पंडीत यांनी पोलिस बंदोबस्तात पार पाडली. 

Web Title: Action on a bar at Buldozar, three in Naupada, on the Thane in Thane bar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.