शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
3
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
4
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
5
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
6
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
7
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
8
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
9
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
10
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
11
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
12
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
13
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
14
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
15
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
16
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
17
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
18
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
19
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
20
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक

अभिनेत्रीच्या कुटुंबावर फसवणुकीचा गुन्हा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 6:36 AM

छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या लोकप्रिय मालिकेतील मराठी अभिनेत्रीच्या काकांना ठाणे पोलिसांनी शनिवारी फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केली. तिचे वडील आणि आणखी एक काकाही या प्रकरणात आरोपी आहेत.

ठाणे : छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या लोकप्रिय मालिकेतील मराठी अभिनेत्रीच्या काकांना ठाणे पोलिसांनी शनिवारी फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केली. तिचे वडील आणि आणखी एक काकाही या प्रकरणात आरोपी आहेत. आरोपी आणि अभिनेत्रीच्या नात्यांबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.कांदिवलीच्या व्यावसायिकाच्या तक्रारीवरून वागळे इस्टेट पोलिसांनी ही कारवाई केली. परेश मिश्रा यांना टिपटॉप प्लाझाजवळ असलेला एक व्यावसायिक गाळा भाड्याने हवा होता. त्यासाठी त्यांनी दोन वर्षांपूर्वी मराठी अभिनेत्रीचे वडील दिलीप विश्वनाथ दुर्गुळे, काका गणेश विश्वनाथ दुर्गुळे आणि रवीकुमार विश्वनाथ दुर्गुळे यांच्याशी सौदा केला. त्यापोटी रोख, आरटीजीएस आणि धनादेशाच्या माध्यमातून आरोपींना ४२ लाख रुपये दिले. मात्र, त्यांनी मिश्रा यांना गाळा भाड्याने दिला नाही. वारंवार टाळाटाळ होत असल्याने मिश्रा यांनी सहा महिन्यांपूर्वी या प्रकरणाची तक्रार वरिष्ठ पोलीस अधिकाºयांकडे केली. चौकशीअंती १७ आॅगस्टला ठाण्यातील मनोरुग्णालयानजीकच्या ओसवाल सोसायटीचे रहिवासी दिलीप विश्वनाथ दुर्गुळे, गणेश विश्वनाथ दुर्गुळे आणि रवीकुमार विश्वनाथ दुर्गुळे यांच्याविरुद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. शनिवारी याप्रकरणी अभिनेत्रीचे काका रवीकुमार विश्वनाथ दुर्गुळे यांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयाने मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा