विनयभंगातील आरोपीने केला महिला पोलिसाचाही विनयभंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 00:44 IST2021-08-13T00:41:16+5:302021-08-13T00:44:12+5:30

विनयभंगातील आरोपी सादीक अन्सारी (३०, रा. भायखळा, मुळ रा. उत्तरप्रदेश) कोपरी पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याने याच ठिकाणी तिथे असलेल्या अन्य एका महिला पोलिसाचाही विनयभंग केला. तसेच सहायक पोलीस निरीक्षक मनिष पठाणे यांच्या कामात अडथळा आणून त्यांच्यावरही हल्ला केला. या धुमश्चक्रीमध्ये पठाणे यांच्या उजव्या हाताच्या बोटाचे हाड फ्रॅक्चर करुन त्यांना गंभीर दुखापत केली.

Accused of molestation also molested a female police officer | विनयभंगातील आरोपीने केला महिला पोलिसाचाही विनयभंग

कोपरी पोलीस ठाण्यातील प्रकार

ठळक मुद्दे कोपरी पोलीस ठाण्यातील प्रकारसहायक पोलीस निरीक्षकावरही केला हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : विनयभंगातील आरोपी सादीक अन्सारी (३०, रा. भायखळा, मुळ रा. उत्तरप्रदेश) कोपरी पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याने याच ठिकाणी तिथे असलेल्या अन्य एका महिला पोलिसाचाही विनयभंग केला. तसेच सहायक पोलीस निरीक्षक मनिष पठाणे यांच्यावर हल्ला केल्याची घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी कोपरी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
कोपरीतील एका १९ वर्षीय तरुणीचा सादीकने कोपरी भाजी मार्केट परिसरात विनयभंग केल्यामुळे त्याला ११ आॅगस्ट रोजी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास कोपरी पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. त्यावेळी त्याने याच पोलीस ठाण्यात पुन्हा गोंधळ घालत तिथे असलेल्या एका महिला पोलिसाचा विनयभंग केला. तसेच सहायक पोलीस निरीक्षक मनिष पठाणे यांच्या कामात अडथळा आणून त्यांच्यावरही हल्ला केला. या धुमश्चक्रीमध्ये पठाणे यांच्या उजव्या हाताच्या बोटाचे हाड फ्रॅक्चर करुन त्यांना गंभीर दुखापत केली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसुझा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करुन पठाणे यांनी सादिकला अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक डी. टी. धोंडे हे अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title: Accused of molestation also molested a female police officer