शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा आरोपी अहमदनगर येथून जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 9:57 PM

मुंब्रा भागातील या अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याचा गुन्हा २९ नोव्हेंबर २०२० रोजी मुंब्रा पोलीस ठाण्यात तिच्या पालकांनी दाखल केला होता. याप्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एक मार्फतही समांतर तपास करण्यात येता.

ठळक मुद्दे ठाणे गुन्हे शाखेची कारवाई मुंब्रा पोलिसांच्या दिले ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: एका १४ वर्षीय मुलीचे अपहरण करुन तिला पळवून नेणाऱ्या सागर मगर (२५, रा. दिवा, ठाणे) याला अहमदनगर येथून अटक करण्यात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे. त्याला गुरुवारी मुंब्रा पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.मुंब्रा भागातील या अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याचा गुन्हा २९ नोव्हेंबर २०२० रोजी मुंब्रा पोलीस ठाण्यात तिच्या पालकांनी दाखल केला होता. याप्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एक मार्फतही समांतर तपास करण्यात येता. दरम्यान, यातील आरोपी सागर मगर यानेच या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले असून तो अहमदनगर जिल्हयातील शेवगाव येथे वास्तव्याला असल्याची माहिती युनिट एकचे पोलीस नाईक अमोल देसाई यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कृष्णा कोकणी, सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल जाधव, पोलीस हवालदार आनंदा भिलारे, पोलीस नाईक अमोल देसाई, माधुरी जाधव आणि राहूल पवार आदींच्या पथकाने २० जानेवारी रोजी अहमदनगर येथे जाऊन सर्व बाबींची पडताळणी केली. अथक परिश्रमांअंती सागर हा शेवगाव येथील कुणाल हॉटेल येथे असल्याची माहिती मिळाली. त्याच माहितीच्या आधारे शेवगाव पोलिसांच्या मदतीने कुणाल हॉटेल येथे छापा मारुन या अल्पवयीन मुलीची सुटका करुन सागर याला या पथकाने ताब्यात घेतले. त्याला आता मुंब्रा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरण