शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
3
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
4
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
5
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
6
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
7
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
8
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
9
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
10
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
12
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
13
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
14
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
15
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
16
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
17
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
18
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
19
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
20
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज

तब्बल दीड महिन्यांनी शरण आला बनावट कागदपत्रांवर आधार ओळखपत्र बनवणारा आरोपी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2018 10:59 PM

शासन मान्यता केंद्रातच अवघ्या दोन हजार रुपयात बनावट कादपत्रांच्या आधारे आधार ओळखपत्र व पॅनकार्ड बनवून देणारा आरोपी तब्बल दीड महिन्यांनी पोलिसांना शरण आला आहे.

मीरा रोड - शासन मान्यता केंद्रातच अवघ्या दोन हजार रुपयात बनावट कादपत्रांच्या आधारे आधार ओळखपत्र व पॅनकार्ड बनवून देणारा आरोपी तब्बल दीड महिन्यांनी पोलिसांना शरण आला आहे. त्याला ठाणे न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. भार्इंदरच्या आंबेडकर मार्गावरील महावीर अपामध्ये राहणारा नरेश जयंतीलाल मेहता याने मेहता असोसिएट्स या नावाने आधार व पॅनकार्ड आदी बनवून देण्याचे कार्यालय थाटले होते. शासनाने देखील केंद्रास मान्यता दिली होती.आॅक्टोबर २०१७ मध्ये सदर केंद्रातून अवघ्या दोन हजार रुपयात कागदपत्रं नसली तरी आधार, पॅनकार्ड बनवून दिले जात असल्याचे उघड झाले होते. या प्रकरणी भार्इंदर पोलीस ठाण्यात तक्रार करून देखील पोलिसांनी कार्यवाही केली नाही. अखेर वरिष्ठांकडे तक्रारदारांनी दाद मागितल्यानंतर १२ डिसेंबर रोजी पोलिसांनी मेहता विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पण मेहता मात्र सहज पसार झाला होता.त्या आधी पोलिसांनी मेहताच्या कार्यालयातून आयकर विभागाच्या आवक जावकचा रबरी शिक्का, भाजपा नगरसेवक डॉ. राजेंद्र जैन यांचे ३ कोरे शिक्के असलेले लेटरपॅड, काँग्रेसचे पालिका निवडणुकीतील उमेदवार साहेबलाल यादव व मुकेश रावल यांचे विशेष कार्यकारी अधिकारी, ठाणेचे शासकीय शिक्के, पोद्दार शाळेचे शाळा सोडल्याचे १५ कोरे दाखले, शिधावाटप पत्रिका व कोरी पानं, विविध जन्म दाखले, लग्न नोंदणी दाखला आदी ताब्यात घेतले होते.गुन्हा दाखल झाल्यावर ८ संगणक पोलिसांनी जप्त केले होते. तर या प्रकरणी पसार झालेल्या आरोपी मेहताने ठाणे न्यायालयातून अटकपूर्व जामीन न मिळाल्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण उच्च न्यायालयाने देखील त्याला गेल्या महिन्यातच हजर होण्यास सांगितले होते. उशिराने का होईना मेहता हा आज वकिलासह भार्इंदर पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी त्याला अटक करुन ठाणे न्यायालयात नेले असता ४ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.मुख्य आरोपी अटक झाल्याने त्याच्या चौकशी नंतर अधिक माहिती समोर येईल अशी शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तवली आहे. तर आधीपासूनच पोलिसांनी या गंभीर प्रकरणी वेळीच दखल घेतली नसल्याने चौकशीबद्दल देखील साशंकता असल्याचे मनसेचे भार्इंदर सचीव प्रमोद देठे यांनी सांगितले.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर