वेळीच वेल्ड फ्रॅक्चर निदर्शनास आल्याने दुर्घटना टळली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 12:55 AM2021-11-29T00:55:12+5:302021-11-29T01:00:10+5:30

रविवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास की-मॅन कांगणे हे ठाणे - पारिसक विभागादरम्यानच्या डाउन फास्ट लाईनवर कार्यरत होते. ते दैनंदिन तपासणी करीत असताना, त्यांना रुळाला वेल्ड फ्रॅक्चर झाल्याचे आढळले. त्यांनी ही माहिती तत्काळ रेल्वेचे ठाणे अभियंता एस. बी. यादव तसेच सुनील सहगल यांना दिली.

The accident was averted as the weld fracture was noticed on time | वेळीच वेल्ड फ्रॅक्चर निदर्शनास आल्याने दुर्घटना टळली

ठाणे-पारसिक दरम्यानची घटना

Next
ठळक मुद्दे ठाणे-पारसिक दरम्यानची घटनाकी-मॅनच्या तत्परतेचे कौतुक

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे-पारिसकदरम्यान जलदगती मार्गावरील रेल्वे रुळाला वेल्ड फ्रॅक्चर झाल्याची घटना रविवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास उघड झाल्याने संभाव्य धोका टळला. ही बाब त्या मार्गावर कार्यरत असलेल्या की-मॅन भाऊसाहेब कांगणे यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी दाखविलेल्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
रविवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास की-मॅन कांगणे हे ठाणे - पारिसक विभागादरम्यानच्या डाउन फास्ट लाईनवर कार्यरत होते. ते दैनंदिन तपासणी करीत असताना, त्यांना रुळाला वेल्ड फ्रॅक्चर झाल्याचे आढळले. त्यांनी ही माहिती तत्काळ रेल्वेचे ठाणे अभियंता एस. बी. यादव तसेच सुनील सहगल यांना दिली. ही माहिती मिळताच अशोक कासैरबल यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि येणाऱ्या रेल्वे तातडीने थांबविल्या. त्याचबरोबर डाऊन जलद मार्गावरील सेवा ठाण्याहून डाऊन धिम्या मार्गावर वळवून काही वेळाने काम पूर्ण झाले. त्यानंतर त्या मार्गावरून रेल्वे सेवा पूर्ववत झाली. कांगणे यांच्या तत्परतेने संभाव्य अपघात टळल्याने त्यांचे मध्य रेल्वेच्या मुंबई विभागप्रमुखांनी कौतुक केले आहे.

Web Title: The accident was averted as the weld fracture was noticed on time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.