म.रे.चा जीवघेणा प्रवास ! डोंबिवलीत रेल्वेतून पडून एकाच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2017 10:52 IST2017-11-17T10:47:38+5:302017-11-17T10:52:26+5:30

मध्य रेल्वेवरील ठाकुर्ली-खंबालपाडादरम्यान रेल्वेमधून पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.  शुक्रवारी (17 नोव्हेंबर) सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे.  

accident on central railway, one dead | म.रे.चा जीवघेणा प्रवास ! डोंबिवलीत रेल्वेतून पडून एकाच मृत्यू

म.रे.चा जीवघेणा प्रवास ! डोंबिवलीत रेल्वेतून पडून एकाच मृत्यू

डोंबिवली - मध्य रेल्वेवरील ठाकुर्ली-खंबालपाडादरम्यान रेल्वेमधून पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.  शुक्रवारी (17 नोव्हेंबर) सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. लोकलमधून प्रवास करत असताना हा प्रवासी ठाकुर्ली 90 फिट रोडवरील नाल्यात पडला. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन त्याला नाल्यातून बाहेर काढले. या जखमी प्रवाशाला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेले जात असताना वाटतेच त्याचा मृत्यू झाला.

डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती ही झारखंड येथील रहिवासी आहे. तसंच हा अपघात मध्यरात्री किंवा पहाटेच्या सुमारास घडला असावा, असेही सांगण्यात आले आहे. या घटनेत मृत व्यक्तीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.   प्रवासादरम्यान तो लोकलमधून खाली पडला, अशी माहिती काही प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला दिली. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर कल्याण-डोंबिवली अग्निशमन दलाचे कर्माचारी घटनास्थळी दाखल झाले व जखमी प्रवाशाला नाल्यातून बाहेर काढण्यात आले. दरम्यान, मृत व्यक्तीजवळ मोबाइल आढळला असून त्याच्याआधारे पुढील तपास सुरू करण्यात आले आहे, असे पीएसआय डुंबरे यांनी सांगितले.

 

 

Web Title: accident on central railway, one dead