सुमारे दोन हजार निर्वासित होणार ‘भारतीय’; नागरिकत्व विधेयक मंजुरीने आशा पल्लवित

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 01:47 AM2019-12-14T01:47:21+5:302019-12-14T01:47:39+5:30

पाकिस्तानात राहिलेल्या सिंधी बांधवांनी होत असलेल्या अत्याचारांमुळे उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या आपल्या नातेवाइकांकडे आश्रय घेतला.

About two thousand refugees to be Indians; The citizen amendment bill raises hope with approval | सुमारे दोन हजार निर्वासित होणार ‘भारतीय’; नागरिकत्व विधेयक मंजुरीने आशा पल्लवित

सुमारे दोन हजार निर्वासित होणार ‘भारतीय’; नागरिकत्व विधेयक मंजुरीने आशा पल्लवित

Next

- सदानंद नाईक 

उल्हासनगर : देशाच्या फाळणीनंतर विस्थापित झालेल्या सिंधी समाजातील ९५ हजारांपेक्षा जास्त नागरिकांना कल्याणजवळील ब्रिटिशकालीन लष्करी छावणीच्या जागी वसवण्यात आले. या वसाहतीला उल्हासनदीवरून उल्हासनगर हे नाव देण्यात आले. पाकिस्तानात राहिलेल्या सिंधी बांधवांनी होत असलेल्या अत्याचारांमुळे उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या आपल्या नातेवाइकांकडे आश्रय घेतला. ते एक वर्षाचा व्हिसा घेऊ न भारतात राहत असून दोन हजारांपेक्षा जास्त ही संख्या आहे. या सिंधी बांधवांना नागरिकत्व विधेयकाचा फायदा होणार असल्याने संसदेत विधेयक मंजूर होताच शहरात पेढे वाटून जल्लोष व्यक्त केला.

दरवर्षी वाढीव व्हिसासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे निर्वासित सिंधी बांधवांना झिजवावे लागत आहे. १०० पेक्षा जास्त नागरिकात्वाचे अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात पडून असून एक वर्षाचा व्हिसा घेणाºया सिंधी बांधवाची संख्या दोन हजारांपेक्षा जास्त असल्याची माहिती जय झुलेलाल संघर्ष समितीचे अध्यक्ष दीपक मंगतानी यांनी दिली. गेल्या आठवड्यात १० अर्ज चौकशीसाठी उल्हासनगर तहसील कार्यालयात आल्याची माहिती तहसीलदार विजयकुमार वाकोडे यांनी दिली.

नागरिकांत्वाचे विधेयक मंजूर झाल्यामुळे शहरात राहणाºया दोन हजारांपेक्षा जास्त नागरिकांना फायदा होणार असल्याची माहिती १९९५ पासून व्हिसावर राहत असलेल्या जलाराम दिवाणी यांनी दिली. २४ वर्षांपासून ते शहरात राहत असून नागरिकत्वाअभावी मुलांच्या शिक्षणात अनेक अडथळे येत आहेत. तसेच घर, जमीनही खरेदी करता येत नाही. तसेच, स्वत:च्या नावाने व्यवसायही करता येत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच, पाकिस्तानमधील हजारो सिंधी समाज भारताच्या आश्रयाला येणार असल्याची आशा त्यांनी व्यक्त केली.

सिंधी समाज व्यावसायिक असल्याने देशाच्या प्रगतीला मोठा हातभार लागण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. या सर्व लोकांना भारताचे नागरिकत्व मिळण्याचा विश्वास आमदार कुमार आयलानी आणि जय झुलेलाल संघर्ष सेवा समितीचे अध्यक्ष दीपक मंगतानी यांनी व्यक्त केली आहे.

धर्म परिवर्तनाच्या भीतीमुळे आश्रय

पाकिस्तानात अल्पसंख्य असलेल्या सिंधी समाजासह विविध धर्माच्या नागरिकांवर अन्याय होत आहे. हजारो जणांचे धर्मपरिवर्तन करत असल्याचे चित्र पाकिस्तानमध्ये आहे. त्यामुळे सिंधी समाजाने धर्मासाठी घरे, जमीन, संपत्ती सोडून कुटुंब आणि नातेवाइकांसह विस्थापित होणे पसंत केले. कट्टर हिंदू आणि देशभक्त असणारा सिंधी समाज देशाच्या प्रगतीत मोठा हातभार लावणार असल्याची प्रतिक्रिया मंगलानी यांनी व्यक्त केले.ंू

Web Title: About two thousand refugees to be Indians; The citizen amendment bill raises hope with approval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.