लोकमान्यनगरमधून अल्पवयीन मुलीचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 05:32 IST2020-03-05T05:32:13+5:302020-03-05T05:32:16+5:30
१७ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार पालकांनी मंगळवारी वर्तकनगर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

लोकमान्यनगरमधून अल्पवयीन मुलीचे अपहरण
ठाणे : लोकमान्यनगर, पाडा क्रमांक ४ येथून कोमल गुप्ता या १७ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार पालकांनी मंगळवारी वर्तकनगर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
जुन्या टीएमटी थांब्याजवळ एकादशी अपार्टमेंटमध्ये गुप्ता कुटुंब राहते. कोमल बारमध्ये काम करते. १७ फेब्रुवारीला रात्री ९.३०च्या सुमारास ती कामानिमित्त घराबाहेर पडली. मात्र ती घरी परतलीच नाही. घरच्यांनी तिच्या मैत्रिणींच्या घरी तसेच उत्तर प्रदेश येथील मूळ गावी आणि नातेवाइकांकडेही शोध घेतला. ती कुठेही न सापडल्याने अपहरणाचा संशय व्यक्त करत तिची आई सलमानी मंगळवारी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल झाला आहे.
महिनाभरात वागळे इस्टेट येथून दोन, नौपाड्यातून दोन तर कळवा येथून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल झाला. त्यातील नौपाड्यातील दोन मुली कर्जत येथे गेल्याचे उघड झाल्यानंतर त्यांना कर्जत येथून ताब्यात घेण्यात आले होते. उर्वरित तीन मुलींचा अद्याप शोध सुरू आहे.