शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

अबकडचे धडे, पण नदी पलिकडे! स्वातंत्र्याच्या अमृत महोत्स्वावी वर्षात चिमुकल्यांचा धोकादायक प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 21:14 IST

भितारवाडी, चाफेवाडी आणि कोठेवाडी या तीन वाड्यांसाठी चाफेवाडी येथे जिल्हा परिषदेची पाचवीपर्यंतची शाळा आहे.

विशाल हळदे - 

ठाणे जिल्ह्यातील शाहपूर तालुक्यात एक तर सुका दुष्काळ, नाही तर ओला दुष्काळ पहायला मिळतो. आपण नुकताच भारतिय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केले. हर घर तिरंगाच्या घोषणा दिल्या गेल्या आणि तिरंगा घेऊन प्रभात फेऱ्या काढल्या गेल्या. असे असताना आज ठाणे जिल्ह्यातील शाहपूर तालुक्याच्या गुंडे ग्रामपंचायतीत असणाऱ्या भितारवाडीच्या शाळेतील विद्यार्थ्यांना जंगलातून 3 किलोमीटर लांब पायी खडतर प्रवास करून येताना पहायला मिळाले. भितारवाडी, चाफेवाडी आणि कोठेवाडी या तीन वाड्यांसाठी चाफेवाडी येथे जिल्हा परिषदेची पाचवीपर्यंतची शाळा आहे. या वाड्यातील विद्यार्थ्यांची पसंती याच शाळेला आणि येथील शिक्षकांना आहे. 27 जणांची पटसंख्या असलेल्या या शाळेत भितारवाडी आणि कोठेवाडी येथील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यासाठी आपला जिव धोक्यात घालून मधे असलेली नदी ओलांडून यावे लागते. मुख्य म्हणजे ऐन पावसाळ्यात नदी ओलांडावी लागत असल्याने मुलांची शाळेला सुट्टी होत आहे आणि खरच अभ्यासू असणारी ही मूलं शिक्षणा पासून वंचित रहात आहेत. 

जोरदार पाऊस आला की डोंगर भागातून येणाऱ्या पावसाने नदीच्या पात्रात वाढ होते आणि पाणी वहाते असल्याने पाण्याचा प्रवाह वाढतो. पावसाने उसंत घेतल्यानंतरच मुलाना शाळेत हजेरी लावता येते, असे पालकांकडून सांगण्यात आले.

एकीकडे स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरे केले, तरीही येथील विद्यार्थी आणि येथील लोकांना रस्ता, पुल, निदान साकव या सुविधा नसल्यामुळ शिक्षण आणि रोजगार यांपासून त्यांना वंचित राहावे लागत असल्याचे आज दिसून आले. विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळावे आणि योग्य सुविधा व्हाव्यात या साठी पालकानी वेळो-वेळी लक्ष वेधले मात्र प्रशासनान त्याकडे दुर्लक्ष केल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या प्रवासाला खंड पडल्याचे जाणवले. या समस्येकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी श्रमजीवी संघटनेचे तालुका सचिव प्रकाश खोडका आणि पालकानी केली आहे.

या वाड्यांमधे 400 जनांची लोकसंख्या आहे शाळेच्या विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन येण्यासाठी स्वतः मी नदीवर जातो नदित उतरून मी विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन येतो आणि शाळा सुटली की पुन्हा नदीच्या काठावर नेऊन सोडतो. माझ्यासोबत पालक देखील असतात. गेल्या कित्येक वर्षापासून आमचा असाच प्रवास सुरु आहे. असे शाळेचे मुख्याध्यापक अतुल बडे यांनी सांगितले.

टॅग्स :Studentविद्यार्थीEducationशिक्षणSchoolशाळाriverनदी