उल्हासनगरात मिक्सर गाडीने तरुणास चिरडले
By सदानंद नाईक | Updated: October 28, 2022 19:00 IST2022-10-28T18:59:42+5:302022-10-28T19:00:51+5:30
बदलापूर मुख्य रस्त्यावर नेवाळी नाका येथे गुरवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान अंबरनाथ येथे राहणारा अमित शरद विचारे-२८ हा तरुण मोटरसायकलवरून घरी जात होता.

उल्हासनगरात मिक्सर गाडीने तरुणास चिरडले
उल्हासनगर : हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बदलापूर रस्त्यातील नेवाळी येथे मिक्सर गाडीच्या खाली सायकलस्वार चिरडून जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी मिक्सर गाडी चालकांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
बदलापूर मुख्य रस्त्यावर नेवाळी नाका येथे गुरवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान अंबरनाथ येथे राहणारा अमित शरद विचारे-२८ हा तरुण मोटरसायकलवरून घरी जात होता. तरुणाने रस्त्यातील स्पीड ब्रेकरमुळे मोटरसायकलचा वेग कमी केला. त्यावेळी मागून आलेल्या भरधाव मिक्सर गाडीने त्याला धडक देऊन चिरडून टाकले. मिक्सर गाडीचे चाक तरुणांच्या डोक्यावरून गेल्याने, त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती हिललाईन पोलिसांना मिळाल्यावर, त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तरुणांचा मृतदेह मध्यवर्ती रुग्णालयात उत्तर तपासणीसाठी पाठविला. याप्रकरणी मिक्सर गाडी चालका विरोधात गुन्हा दाखल केला असून हिललाईन पोलीस अधिक तपास करीत आहेत. या घटनेने अंबरनाथ परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.