ठाण्यातील सिनेवंडर मॉलजवळ भीषण आग, व्हिडिओतून समोर आली दाहकता
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 21:39 IST2023-04-18T21:24:46+5:302023-04-18T21:39:48+5:30
सिनेवंडर मॉलच्या जवळील इमारतील अचानक आग लागल्याने परिसरात गोंधळ निर्माण झाला होता.

ठाण्यातील सिनेवंडर मॉलजवळ भीषण आग, व्हिडिओतून समोर आली दाहकता
ठाणे - शहरातील घोडबंदर रोडवरील सिनेवंडर मॉलच्या बाजूच्या इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. याबाबात माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून आग आटोक्यात आणण्यात येत आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून आगीचे व्हिडिओ सोशल मीडियातून समोर आले आहेत.
कापूरबावडी येथील बिझनेस पार्क आणि सिने वंडर मॉल येथे ही आग लागल्याची घटना घडली. या आगीत काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. रात्री ८.३७ च्या सुमारास ही आग लागल्याची माहिती आहे. आग विझवण्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी, कर्मचारी व अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान, फायर वाहन, व रेस्क्यू वाहन, वॉटर टँकर, जम्बो वॉटर टँकर वाहनासह हजर झाले आहेत. मुख्य रस्त्याच्या जवळच हा मॉल असल्याने या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. मॉल असल्याने तिथे सिनेमाचा शो सुरू होता अशी माहिती देखील पुढे येत आहे.
सिनेवंडर मॉलच्या जवळील इमारतील अचानक आग लागल्याने परिसरात गोंधळ निर्माण झाला होता. या आगीचे लोळ दूरपर्यंत दिसून आल्याने आगीची तीव्रता अधिक असल्याचे जाणवली. त्यामुळे, अग्निशमन दलानेही तात्काळ धाव घेत पाणी टाकून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केला. दरम्यान, आगीत मोठं नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ठाणे - शहरातील घोडबंदर रोडवरील वंडर मॉलच्या पाठीमागे मोठी आग लागल्याची घटना pic.twitter.com/YxQJjMsMOG
— Lokmat (@lokmat) April 18, 2023