भिवंडीत गादी कारखान्याला भीषण आग 

By नितीन पंडित | Updated: February 20, 2024 21:03 IST2024-02-20T21:02:50+5:302024-02-20T21:03:03+5:30

नितीन पंडित भिवंडी : शहरातील ईदगाह रोड परिसरातील फकी कंपाउंड परिसरात गादी कारखान्यासह गोदामाला भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी ...

A terrible fire broke out at a mattress factory in Bhiwandi | भिवंडीत गादी कारखान्याला भीषण आग 

भिवंडीत गादी कारखान्याला भीषण आग 

नितीन पंडित

भिवंडी: शहरातील ईदगाह रोड परिसरातील फकी कंपाउंड परिसरात गादी कारखान्यासह गोदामाला भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली आहे. या आगीत मोठ्या प्रमाणात कापूस व तयार गाद्या जळून खाक झाल्या आहेत. 

ही आग भीषण असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाले आहेत.या आगीत संपूर्ण गोदाम जळून खाक झाले असून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.आगीचे नेमकी कारण अजून समजू शकले नाही. या परिसरातील रस्ते अरुंद असल्याने अग्निशमन दलाचे फायरबंब व पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल होण्यास प्रचंड अडचण येत होती.
 

Web Title: A terrible fire broke out at a mattress factory in Bhiwandi