कॅसलमिल सर्कल येथील पथदिव्याचा खांब कोसळला; आपत्ती विभागाच्या जवानांची धाव

By जितेंद्र कालेकर | Updated: May 7, 2023 09:41 IST2023-05-07T09:40:02+5:302023-05-07T09:41:06+5:30

कॅसल मिल सर्कल भागातील कलम मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलसमोर असलेल्या रस्त्यावर दूरदर्शनची केबल अज्ञात वाहनांमध्ये अडकल्याने रस्त्यालगत असलेला ठाणे महापालिकेचा पथदिव्याचा खांबा रस्त्यावर पडला

A street lamp at Castlemill Circle collapsed; The run of disaster department personnel | कॅसलमिल सर्कल येथील पथदिव्याचा खांब कोसळला; आपत्ती विभागाच्या जवानांची धाव

कॅसलमिल सर्कल येथील पथदिव्याचा खांब कोसळला; आपत्ती विभागाच्या जवानांची धाव

ठाणे: कॅसलमिल सर्कलजवळ असलेला विद्युत पथदिव्याचा खांब कोसळल्याची घटना शनिवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नसल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.    

कॅसल मिल सर्कल भागातील कलम मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलसमोर असलेल्या रस्त्यावर दूरदर्शनची केबल अज्ञात वाहनांमध्ये अडकल्याने रस्त्यालगत असलेला ठाणे महापालिकेचा पथदिव्याचा खांबा रस्त्यावर पडला. ही माहिती मिळताच घटनास्थळी ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागासह स्ट्रीट लाईट विद्युत विभागाच्या कर्मचाºयांनी धाव घेतली. विद्युत कर्मचाºयासह या पथकांनी रस्त्यावर पडलेला पथदिव्याचा खांब एका बाजूला केल्याने रस्ता वाहतूकीसाठी मोकळा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: A street lamp at Castlemill Circle collapsed; The run of disaster department personnel