भिवंडीत भरधाव रिक्षाची दुभाजकला धडक; दोघांचा मृत्यू
By नितीन पंडित | Updated: March 8, 2024 22:05 IST2024-03-08T22:04:52+5:302024-03-08T22:05:01+5:30
भिवंडी : तालुक्यातील पडघा रस्त्यावर रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला वाचविण्याच्या नादात भरधाव रिक्षाने रस्त्यावरील दुभाजकास ठोकर दिल्याने झालेल्या अपघातात दोघा ...

भिवंडीत भरधाव रिक्षाची दुभाजकला धडक; दोघांचा मृत्यू
भिवंडी: तालुक्यातील पडघा रस्त्यावर रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला वाचविण्याच्या नादात भरधाव रिक्षाने रस्त्यावरील दुभाजकास ठोकर दिल्याने झालेल्या अपघातात दोघा जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली आहे .
भिवंडी पडघा रस्त्यावर निंबवली गावाच्या हद्दीत एक दुचाकी रस्ता ओलांडत असताना त्याच सुमारास एक भरधाव रिक्षा रस्त्यावरून जात असताना समोर दुचाकी दिसल्याने दुचाकी चालकास वाचविण्याच्या नादात रिक्षा चालकाला आपली रिक्षा नियंत्रित करता न आल्याने त्याने थेट रस्ते दुभाजकास धडक दिल्याने त्यामध्ये रिक्षातील किशोर पाटिल व सतीश जाधव यांचा अपघातात मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी आहेत.
त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना कळवा येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या अपघाताचा थरार रस्त्यालगत असलेल्या एका सीसीटिव्ही मध्ये कैद झाली आहे. दरम्यान या अपघाताच्या घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात अजून ही सुरू आहे .