शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग; बदलापूरमधील धक्कादायक घटना
By पंकज पाटील | Updated: December 6, 2022 20:04 IST2022-12-06T20:02:53+5:302022-12-06T20:04:19+5:30
बदलापूर येथे शिक्षकाने दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली.

शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग; बदलापूरमधील धक्कादायक घटना
बदलापूर : आपल्या संस्कृतीत आईवडिलांइतकेच गुरूंना वंदनीय मानले जाते. परंतु बदलापुरातील एका वासनांध शिक्षकाने मात्र दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थीनीचा विनयभंग करून गुरुशिष्य या पवित्र नात्याला कलंकित केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
बदलापूर पूर्वेकडील योगी श्री अरविंद गुरुकुल शाळेत हा प्रकार घडला आहे. या शाळेत भूगोल व क्रीडा विषयाचा शिक्षक असलेल्या अजित इरमाळी याने मोटरसायकलची चावी आणण्याच्या बहाण्याने दहावीच्या विद्यार्थिनीला शाळेच्या पहिल्या माळ्यावर असलेल्या क्रीडा साहित्याच्या रूममध्ये पाठवले. त्यानंतर तिच्यापाठोपाठ तो पण क्रीडा साहित्य रूममध्ये गेला. आणि चावी इथेच आहे असे बोलत रूमचा दरवाजा आत ओढून घेतला.आणि या विद्यार्थ्यांनीला दरवाजाच्या दिशेला ढकलून मनात लजजा उत्पंन होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. दरम्यान, याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या वासनांध शिक्षकाला गजाआड करण्यात आले आहे. महिला पोलिस निरीक्षक स्वाती पेटकर अधिक तपास करीत आहेत.