अधिक्षकांना खड्डयांच्या छायाचित्रांचा संच भेट, मनसेचं अनोखं निदर्शन

By अजित मांडके | Published: September 26, 2022 03:19 PM2022-09-26T15:19:39+5:302022-09-26T15:20:27+5:30

अधिक्षकांच्या दालनातच खड्ड्यांचे प्रदर्शन भरविले, घोडबंदर रस्त्यावरील खड्ड्यावरून संताप व्यक्त

A set of photographs of potholes was presented to the Superintendent, a unique demonstration by the MNS | अधिक्षकांना खड्डयांच्या छायाचित्रांचा संच भेट, मनसेचं अनोखं निदर्शन

अधिक्षकांना खड्डयांच्या छायाचित्रांचा संच भेट, मनसेचं अनोखं निदर्शन

Next

ठाणे : गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून ठाणेकरांना घोडबंदर मार्गावरील खड्ड्यामुळे तासंतास रांगेत तात्कळत रहावे लागत आहे. खड्ड्यामुळे अनेकांचा जीव तर गेलाच तर अनेक अॅब्युलन्सही अडकल्याने आता खड्डे ठाणेकरांच्या जीवावर आले आहेत. याचा संताप व्यक्त करत मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष जनहित व विधी विभागाचे स्वप्नील महिंद्रकर आणि उपशहर अध्यक्ष पुष्कर विचारे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षकांना खड्ड्यांच्या छायाचित्रांचा संच भेट देत निदर्शने केली, शिवाय त्यांच्याच दालनात खड‌्ड्यांचे प्रदर्शन भरवित त्यांना खड्डे दाखवून देण्यात आले.

घोडबंदर राज्य महामार्ग ४२ वर दररोज दहा हजार वाहने या रस्त्यावरून धावत असतात. देशातील महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग ४८ ला जोडणारा रस्ता हा घोडबंदर रस्ता आहे.अपनवेल जेनपीटी ,नवी मुंबई,अवेस्टर्न सर्बस,ठाणे ,नाशिक या सर्व भागांना जोडणारा घोडबंदर रस्ता हा महत्वाचा रस्ता आहे. त्यामुळे अवजड वाहनांबरोबरच एस. टी., बसेस, चारचाकी, मोटरसायकल, रिक्षा अशी वाहने मोठ्या प्रमाणात असतात. या रस्त्याचा बहुतांशी भाग देखभाली करता सार्वजनिक बांधकाम विभागाला मार्च २०२१ ला एमएसआरडीसीने देऊन सुद्धा या रस्त्याची खूपच दैनिय अवस्था झाली आहे. खड्ड्यामुळे या घोडबंदर रस्त्यावर नेहमीच दोन-दोन तास वाहतूक कोंडी होत असून याचा नाहक त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. या रस्त्यासाठी २५० कोटी रुपये खर्च करण्यात आला असून या मार्गावरील असणारे टोल २३ फेब्रुवारी २०२१ रोजी बंद झाले आहे. तेव्हा पासून गेल्या दीड वर्षात सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याचे कोणतेही काम केलेले नाही.

मुख्यमंत्र्यांच्या घरापासून अवघ्या ५ ते ७ किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या या राज्य महामार्गची दुरावस्था असूनही त्याची दुरूस्ती होत नाही हेच नवल आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविले जात नाहीत म्हणून सोमवारी मनसेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक विलास कांबळे  यांना घोडबंदर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या छायाचित्राचा संच भेट देऊन त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. तसेच त्याच्या दालनामध्ये खड्ड्यांचे प्रदर्शन भरवित त्यांना कुठे-कुठे खड्डे पडले आहेत हे दाखवून दिले. दरम्यान अधीक्षक कांबळे यांनी या रस्त्याच्या कामासाठी प्रस्तावित झालेला निधी हा नवीन आलेल्या सरकारने थांबवल्यामुळे कामे प्रलंबित असल्याचे सांगितले.
यावेळी मनसेचे सौरभ नाईक, निलेश चौधरी, ,राजेंद्र कांबळे, आशिष उमासरे, दत्ता चव्हाण,आशिष डोळे,किशोर पाटील,समीर हरद, मीनल नवल आदी सहभागी झाले होते.

Web Title: A set of photographs of potholes was presented to the Superintendent, a unique demonstration by the MNS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.