अंबरनाथमध्ये रासायनिक कारखान्यात एकामागोमाग भीषण स्फोटांनी हादरे; काही मिनिटांतच आगीचे रौद्ररूप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 10:15 IST2026-03-10T09:55:14+5:302026-03-10T10:15:12+5:30

शेजारच्या दाेन कारखान्यांनाही झळ; रात्री उशिरापर्यंत ‘कूलिंग’

A series of massive explosions rocked a chemical factory in Ambernath; a fire broke out within minutes | अंबरनाथमध्ये रासायनिक कारखान्यात एकामागोमाग भीषण स्फोटांनी हादरे; काही मिनिटांतच आगीचे रौद्ररूप

अंबरनाथमध्ये रासायनिक कारखान्यात एकामागोमाग भीषण स्फोटांनी हादरे; काही मिनिटांतच आगीचे रौद्ररूप

अंबरनाथ : येथील आनंदनगर एमआयडीसीत श्री गणेश केमिकल्स या रासायनिक कारखान्यात सोमवारी सायंकाळी ६ वाजता मोठी आग लागली. त्यानंतर कारखान्यात रसायनाने भरलेल्या ड्रमचे एकामागून एक मोठे स्फोट झाल्याने काही मिनिटांतच आगीने रौद्ररूप धारण केले. स्फोटामुळे आगीचा भडका उडून श्री गणेश केमिकल्सच्या शेजारच्या दोन कारखान्यांनाही आगीची झळ पोहोचली. आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही. 

आग लागल्यानंतर तातडीने सर्व कामगारांना बाहेर काढण्यात आले. रात्री उशिरा मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही तसेच कोणीही जखमी झाल्याची माहिती मिळाली नसल्याचे एमआयडीसीचे अभियंता सुधीर कुंभार यांनी ‘लोकमत’ला सांगितले. एमआयडीसी अग्निशमन केंद्राच्या दलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले. 

तळोजा एमआयडीसी, अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिका, उल्हासनगर आणि कल्याण महापालिकेचे अग्निशमन दलाचे बंबही घटनास्थळी पोहोचले. त्यांनी साधारण साडेआठ वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर कूलिंग ऑपरेशन सुरू केल्याचे कुंभार यांनी सांगितले. 

दाेन किलाेमीटरपर्यंत जाणवले हादरे

संध्याकाळी एकापाठोपाठ झालेल्या स्फोटांनी आनंदनगर एमआयडीसी हादरली. श्री गणेश केमिकल्स कारखान्यात रसायनांचा मोठा साठा असल्याने स्फोटांची तीव्रता मोठी होती. स्फोटांचे हादरे दोन किलोमीटर अंतरावरील कारखान्यांमधील कामगारांना जाणवले. रसायनांच्या ड्रमचे स्फोट झाल्यानंतर संपूर्ण रसायन एमआयडीसीच्या रस्त्यांवर पसरले होते. तेथेही आग पसरली होती. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अडचणी आल्या. 

बघ्यांची गर्दी, पोलिसांची कसरत 

आग लागल्यानंतर कारखाना परिसरात मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी झाली होती. मात्र, स्फोट होऊ लागल्याने नागरिक सुरक्षितस्थळी धावू लागले. बघ्यांची गर्दी आवरण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागली. काहीजण मोबाइलमध्ये आगीचे चित्रीकरण करत होते. 

Web Title : अंबरनाथ रासायनिक कारखाने में भीषण विस्फोट, आग; कोई हताहत नहीं

Web Summary : अंबरनाथ के एक रासायनिक कारखाने में भीषण आग लगने से कई विस्फोट हुए। आग आसपास के कारखानों में फैल गई। सभी श्रमिकों को सुरक्षित निकाल लिया गया; कोई चोट या मौत नहीं हुई। दमकल कर्मियों ने व्यापक प्रयासों के बाद आग पर काबू पाया।

Web Title : Massive Explosions, Fire Engulf Ambernath Chemical Factory; No Casualties

Web Summary : A major fire broke out at a chemical factory in Ambernath, triggering multiple explosions. The blaze spread to nearby factories. All workers were evacuated safely; no injuries or fatalities reported. Firefighters controlled the inferno after extensive efforts.