उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड
By सदानंद नाईक | Updated: October 2, 2025 17:40 IST2025-10-02T17:39:40+5:302025-10-02T17:40:17+5:30
Ulhasnagar Crime News: उल्हासनगरमधील कॅम्प नं-२, शाळा क्रं-२४ येथील गरीब्याच्या ठिकाणी मंगळवारी रात्री साडे बारा वाजता शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून हवेत गोळीबार करणाऱ्या सोहम पवार याला गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात सोहमसह वडील अनिल पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाला.

उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड
- सदानंद नाईक
उल्हासनगर - कॅम्प नं-२, शाळा क्रं-२४ येथील गरीब्याच्या ठिकाणी मंगळवारी रात्री साडे बारा वाजता शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून हवेत गोळीबार करणाऱ्या सोहम पवार याला गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात सोहमसह वडील अनिल पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाला.
उल्हासनगर कॅम्प नं-२, शाळा क्रं-२४ येथे बालाजी मित्र मंडळाचा दरवर्षी गरबा असतो. मंगळवारी रात्री गरबा संपल्यानंतर बारा वाजण्याच्या दरम्यान गरीब्याचे प्रमुख व शिवसेना शाखाप्रमुख सुभाष भगुरे यांच्या जवळ सोहम पवार नावाचा तरुण येऊन, गरब्याला परवानगी घेतली का नाही?. असा प्रश्न केला. तेंव्हा महापालिका व पोलिसांची परवानगी घेतल्याचे भगुरे म्हणाले. मात्र माझी परवानगी का घेतली नाही. असे धमकावीत पिस्तूल काढून भगुरे यांच्या डोक्याला लावली. त्यावेळी गरीब्याला आलेले नागरिक व भगुरे याचा भाऊ मध्ये पडल्याने, सोहम पवार याने तेथून काढता पाय घेतला. मात्र जाते वेळी त्याने पिस्तूल मधून हवेत गोळीबार केला. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड यांनी दिली.
शहर गुन्हे अन्वेषण विभागाने गोळीबार प्रकरणी सोहम पवार याचा शोध घेतला असता, तो अनिल-अशोक चित्रपटगृहा मागील जुना तलाव पातळी परिसरात मिळून आला. अन्वेषण विभागाने त्याला अटक केली असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती उघड झाली.