उल्हासनगरात एका अल्पवयीन टोळक्याला ८ दुचाकींसह अटक
By सदानंद नाईक | Updated: May 14, 2025 18:39 IST2025-05-14T18:39:29+5:302025-05-14T18:39:55+5:30
Ulhasnagar News: उल्हासनगर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई राजेंद्र थोरवे यांना गुप्त बातमी मिळाली की, अमरडाय कंपनी जवळ उल्हास नदीकडे जाणाऱ्या रोडवर ऐक टोळके चोरीच्या दुचाकी फिरवीट असल्याची माहिती दिली.

उल्हासनगरात एका अल्पवयीन टोळक्याला ८ दुचाकींसह अटक
- सदानंद नाईक
उल्हासनगर - उल्हासनगर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई राजेंद्र थोरवे यांना गुप्त बातमी मिळाली की, अमरडाय कंपनी जवळ उल्हास नदीकडे जाणाऱ्या रोडवर ऐक टोळके चोरीच्या दुचाकी फिरवीट असल्याची माहिती दिली. माहितीच्या आधारे पोलिसांचे ऐक पथक सोमवारी रात्री घटनास्थळी जाऊन मोटर सायकली चालविणाऱ्या टोळक्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीच्या ८ मोटरसायकली जप्त करण्यात आले.
उल्हासनगर कॅम्प नं-१, शहाड येथील अमरडाय कंपनी समोरील रस्त्यावर चोरीच्या मोटर सायकली चालविणारे अल्पवयीन मुलाच्या टोळक्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी तब्बल ८ मोटर सायकली चोरल्याचे उघड झाले. या अल्पवयीन मुलांचे वय १४ ते १७ वर्षाच्या दरम्यान आहे. त्यांनी आंबिवली येथील इराणी परिसरातील भोला इराणी याच्या सोबतीने पडघा व कल्याण तालुका पोलीस स्टेशन, वर्तकनगर पोलीस स्टेशन येथून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून एकुण ८ मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. मोटर सायकली गुन्ह्यातील जप्त मोटार सायकलीची एकूण किंमत ३ लाख ९० हजार रुपये आहेत. यातील ८ पैकी ७ आरोपी अल्पवयीन म्हणजे विधी संघर्षित बालक असून त्यांना समज पत्रासह पालकांच्या ताब्यात देण्यात आले. यातील आरोपी नामे हर्षद भरत सुपे यास मुद्देमालसह विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात रिपोर्टसह हजर राहणायचे बजाविले आहे. अधिक तपास उल्हासनगर पोलीस करीत आहेत.