चारित्र्याच्या संशयावरून पतीची पत्नीला जबर मारहाण, गुन्हा दाखल
By नितीन पंडित | Updated: September 26, 2022 17:52 IST2022-09-26T17:51:19+5:302022-09-26T17:52:21+5:30
३६ वर्षीय पत्नी आपल्या पती व दोन मुलांसह पद्मानगर येथील एका इमारतीमध्ये राहते.

चारित्र्याच्या संशयावरून पतीची पत्नीला जबर मारहाण, गुन्हा दाखल
भिवंडी -पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन झालेल्या वादात पतीने पत्नीस जबर मारहाण केल्याची घटना पद्मानगर येथे रविवारी घडली. या प्रकरणी ३६ वर्षीय महिलेने आपल्या पतीविरोधात शहर पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल केला आहे.
३६ वर्षीय पत्नी आपल्या पती व दोन मुलांसह पद्मानगर येथील एका इमारतीमध्ये राहते. रविवारी दोन्ही लहान मुले घराबाहेर खेळण्यास गेली असता पतीने स्वयंपाक घरात काम करीत असलेल्या पत्नीशी भांडण केले व तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्यावर शारीरिक अत्याचार करण्याच्या इराद्याने हल्ला चढविला. तिच्या अंगावरील कपडे फाडले असता पतीच्या अत्याचारास विरोध करताच तिचे केस पकडून डोके भिंतीवर आदळले, यामुळे पत्नीच्या कानातून व तोंडातून रक्त येऊ लागले त्यानंतर ही पती न थांबता पत्नीस धमकावत, चापटीने मारहाण केली त्यानंतर लाकडी पाट व खलबत्या मधील लोखंडी बत्ता महिलेच्या पाठीत मारून दुखापत करून तिला गंभीर जखमी केले.
या मारहाण प्रकरणी पत्नीने पती विरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने पोलिसांनी पती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.