भिवंडीतील वऱ्हाळदेवी तलावात बुडल्याने 9 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू

By नितीन पंडित | Updated: September 6, 2022 20:02 IST2022-09-06T20:01:34+5:302022-09-06T20:02:04+5:30

सकाळी नऊ ते दहा वाजताच्या सुमारास कामतघर येथील वऱ्हाळ तलावा शेजारील काटेकर क्रीडांगण येथे काही मुले खेळण्यासाठी गेले

A 9-year-old boy died after drowning in Varhaldevi lake in Bhiwandi | भिवंडीतील वऱ्हाळदेवी तलावात बुडल्याने 9 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू

भिवंडीतील वऱ्हाळदेवी तलावात बुडल्याने 9 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू

भिवंडी : शहरातील वऱ्हाळदेवी तलावाजवळ मुलांसह खेळण्यासाठी गेलेल्या ९ वर्षीय चिमुरड्याचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी घडली आहे. आर्यन पिंटूकुमार चंद्रवंशी रा .काटेकर नगर कामतघर असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.
          
सकाळी नऊ ते दहा वाजताच्या सुमारास कामतघर येथील वऱ्हाळ तलावा शेजारील काटेकर क्रीडांगण येथे काही मुले खेळण्यासाठी गेले असता त्यापैकी काही मुले पाण्यात पोहण्यास उतरले असता आर्यनचा तोल गेल्याने तो पाण्यात बुडू लागला. त्याच्या सोबत असलेल्या मुलांनी आरडाओरड केल्या नंतर त्या ठिकाणी नागरीक धावून आले.पण आर्यन चा शोध लागला नाही त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी दोन तासांच्या शोध मोहिमे नंतर आर्यनचा मृतदेह तलावातून बाहेर काढला.या बाबत शहर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय उपजिल्हा रुग्णालयात रवाना केला आहे.या दुर्घटने नंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून वऱ्हाळ तलावात बुडून मृत्यूच्या घटना नियमित होत असताना पालिका प्रशासन तलावाच्या सुरक्षे करीता कोणतीही उपाययोजना करीत नसल्या बद्दल नागरीकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
 

Web Title: A 9-year-old boy died after drowning in Varhaldevi lake in Bhiwandi