८३ हजार कुटुंबांना ‘आरोग्यकवच’, कुटुंबांची संख्या वाढण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 01:44 AM2018-05-12T01:44:32+5:302018-05-12T01:44:32+5:30

केंद्र सरकारने ठाणे जिल्ह्यातील (ग्रामीण) ८३ हजारांहून अधिक कुटुंबांना प्रधानमंत्री राष्टÑीय स्वास्थ्य सुरक्षा मिशन (आयुष्यमान भारत) या योजनेंतर्गत समाविष्ट केले आहे.

83 thousand families are more likely to be 'healthy', increasing the number of families | ८३ हजार कुटुंबांना ‘आरोग्यकवच’, कुटुंबांची संख्या वाढण्याची शक्यता

८३ हजार कुटुंबांना ‘आरोग्यकवच’, कुटुंबांची संख्या वाढण्याची शक्यता

Next

ठाणे : केंद्र सरकारने ठाणे जिल्ह्यातील (ग्रामीण) ८३ हजारांहून अधिक कुटुंबांना प्रधानमंत्री राष्टÑीय स्वास्थ्य सुरक्षा मिशन (आयुष्यमान भारत) या योजनेंतर्गत समाविष्ट केले आहे. त्यानुसार, या प्रत्येक कुटुंबाचा प्रत्येक वर्षासाठी पाच लाखांचा ‘आरोग्य विमा’ उतरवला जाणार आहे. ही आकडेवारी २०११ रोजी केलेल्या माहिती संकलनानुसार (सर्व्हे) असून त्या प्रत्येक कुटुंबाची पुन्हा तालुकानिहाय माहिती संकलनाचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये भिवंडी आणि मुरबाड या तालुक्यांत ९० टक्के काम पूर्ण झाले असून संख्या वाढण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
केंद्र सरकारद्वारे देशभरातील प्रत्येक कुटुंबाचे आर्थिक व सामाजिक निष्कर्षाद्वारे २०११ या वर्षी माहिती संकलन केले. त्यानुसार, देशात १० करोड, तर राज्यात ८३ लाख ७४ हजार कुटुंबं त्या निष्कर्षाखाली असल्याचे समोर आले आहे. त्यावेळी केलेल्या माहिती संकलनानुसार, कुटुंबामध्ये कोणाचे नाव राहिले आहे का तसेच यादरम्यान, कोणाचे निधन झाले आहे का? त्याचबरोबर ते कुटुंब दुसऱ्या जिल्ह्यात किंवा राज्यात स्थलांतरित झाले नाही ना, यासाठी पुन्हा त्या कुटुंबांचे माहिती संकलन केले जात आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी बीडीओ, तालुका अधिकारी, डीएचओ यांच्या सभा घेतल्यानंतर जिल्हा आरोग्य विभागामार्फत आशा आणि एएनएम यांना त्याबाबत प्रशिक्षण देत १ ते ८ मे दरम्यान पुन्हा काम सुरू केले आहे. तर, आतापर्यंत जिल्ह्यातील भिवंडी आणि मुरबाड दोन तालुक्यांत ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. तर, उर्वरित तालुक्यात हे काम सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. ही योजना सध्या प्राथमिक स्तरावर असून योजनेंतर्गत लवकर आर्थिक व सामाजिक निष्कर्षाखाली असलेल्या त्या प्रत्येक कुटुंबाला आरोग्यकवच मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

ही माहिती केली जाते गोळा
माहिती संकलन पूर्ण झाल्यावर प्रत्येक कुटुंबाची माहिती आॅनलाइन दिसणार आहे. त्यासाठी त्या कुटुंबप्रमुखाचा मोबाइल नंबर, शिधावाटप क्रमांक आणि नावे यांची माहिती संकलित केली जात आहे. सर्वाधिक कुटुंबे भिवंडीत
ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक ३०,८११ कुटुंबे शहापूर तालुक्यात आहेत. त्याचपाठोपाठ भिवंडी, मुरबाड, कल्याण आणि अंबरनाथ या तालुक्यांत आहेत.

Web Title: 83 thousand families are more likely to be 'healthy', increasing the number of families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.