शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ७८० कोरोनाचे नवे रुग्ण; तीन जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2021 7:58 PM

ठाणे जिल्ह्यात दिवसभरात तीन रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या सहा हजार ३०२ झाली आहे.  

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे ७८० रुग्ण रविवारी आढळले आहेत. जिल्ह्यात आता दोन लाख ६९ हजार ८४५ रुग्ण संख्या झाली. जिल्ह्यात दिवसभरात तीन रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या सहा हजार ३०२ झाली आहे.             ठाणे शहरात १८५ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता ६३ हजार ६८१ झाली आहे. शहरात एकही  मृत्यू नसल्यामुळे मृत्यूची संख्या एक हजार ४०० झाली. कल्याण - डोंबिवलीत २७१ रुग्णांची वाढ झाली असून एकही मृत्यू नाही. आता ६४ हजार ६५७ रुग्ण बाधीत असून एक हजार २०७ मृत्यूची नोंंद आहे.             उल्हासनगरमध्ये १८ रुग्ण सापडले असून मृत्यू नाही. येथील बाधितांची संख्या ११ हजार ९७५ झाली. तर, ३७२ मृतांची नोंद आहे. भिवंडीला चार बाधीत आढळून आले असून एकही मृत्यू नाही. आता बाधीत सहा हजार ८३५ असून मृतांची संख्या ३५५ आहे. मीरा भाईंदरमध्ये ५२ रुग्ण आढळले असून एक मृत्यू नाही.  या शहरात  बाधितांची संख्या २७ हजार ४८७ असून मृतांची संख्या ८०४ आहे.

     अंबरनाथमध्ये ३१  रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. येथे बाधीत आठ  हजार ९५२ असून मृत्यू ३१५ आहेत. बदलापूरमध्ये ५९ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधीत १० हजार १८४ झाले आहेत. या शहरात एक मृत्यू  झाल्यामुळे मृत्यूची संख्या १२३ कायम आहे. ग्रामीणमध्ये २० रुग्णांची वाढ झाली असून एक मृत्यू नाही. तर बाधीत १९ हजार ६९३ झाले असून  आतापर्यंत ५९७ मृत्यू नोंदले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस