शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यातील ७५ अंगणवाड्यांची दुरुस्ती

By admin | Updated: October 16, 2015 01:43 IST

जिल्ह्यातील सहा वर्षे वयोगटातील मुले अंगणवाडी व मिनी अंगणवाड्यांमध्ये मोडकळीस आलेल्या वास्तूंत शिकत आहेत. मात्र, दुरवस्थेमुळे त्यांची दुरुस्ती किंवा नवीन वास्तू उभी करण्याकडे फारसे लक्ष देण्यात आले

सुरेश लोखंडे, ठाणेजिल्ह्यातील सहा वर्षे वयोगटातील मुले अंगणवाडी व मिनी अंगणवाड्यांमध्ये मोडकळीस आलेल्या वास्तूंत शिकत आहेत. मात्र, दुरवस्थेमुळे त्यांची दुरुस्ती किंवा नवीन वास्तू उभी करण्याकडे फारसे लक्ष देण्यात आले नव्हते. परंतु, राज्य शासनाने आॅगस्टमध्ये काढलेल्या जीआरमुळे ठाणे जिल्हा परिषदेने सुमारे ७५ अंगणवाड्यांच्या दुरुस्तीचे काम काढले आहे.जिल्ह्यातील ग्रामीण भागात बहुतांशी अंगणवाड्या दीर्घकाळापासून नादुरुस्त असतानाही त्याकडे फारसे लक्ष दिले नव्हते. याआधी जि.प.ला बांधकाम विभागाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून ही कामे करावी लागत असत. त्यामुळे त्याकडे फारसे लक्ष दिले जात नव्हते. पण, आता महिला बालकल्याण विभागाकडून मिळणाऱ्या जि.प.च्या बजेटच्या १० टक्के तरतुदीतून नवीन अध्यादेशानुसार कामे करावी लागणार आहेत. त्यानुसार, तत्काळ ७५ अंगणवाड्यांची कामे हाती घेऊन त्यावर सुमारे ८० लाख खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी या १० टक्के रकमेतून मुलांच्या अभ्यासक्रमासह बैठक व्यवस्था, साहित्य खरेदी, अंगणवाडी सेविकांचा प्रशिक्षण खर्च केला जात असे. परंतु, आता त्यातून दुरुस्तीची कामेही घेतल्यामुळे बालकांच्या सोयीसुविधा, साहित्य खरेदीत कपात होण्याची शक्यता आहे. यामुळे ठेकेदारही आता त्याकडे लक्ष देऊन कामे करण्यासाठी सरसावले आहेत. जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाव्दारे जिल्ह्यात सद्य:स्थितीला मिनी अंगणवाड्यांसह १८५४ अंगणवाड्या कार्यरत आहेत. यामध्ये सुमारे एक लाख ३९ हजार २४१ सहा वर्षे वयोगटापर्यंतची मुले शिक्षणाची तोंडओळख करीत आहेत. त्यासाठी सुमारे तीन हजार ७०८ सेविकांसह मदतनीस कार्यरत आहेत.