शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024: कोलकाता हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
2
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
3
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
4
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
5
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
6
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
7
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
8
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
9
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
10
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
11
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
12
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
13
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
14
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
15
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
16
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
17
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
18
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
19
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
20
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका

ठाणे जिल्ह्यात ६१ लाख मतदारांसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज ; आचारसंहिता भंगच्या अ‍ॅपवरील तक्रारीवर अवघ्या दीड तासात कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 6:16 PM

* तिन्ही लोकसभा मतदारसंघासाठी ६०९४३०८ मतदार - जिल्हह्यातील तिन्ही लोकसभा मतदार संघासाठी आजमितीस ६० लाख ९४ हजार ३०८ मतदार निश्चित आहेत. २०१४च्या निवडणुकीच्या तुलनेत सुमारे पाच लाख ८० हजार ७८३ मतदारांची वाढ झाली. ठाणे - पालघर जिल्हा विभाजनानंतरही पहिली स्वतंत्र ठाणे जिल्ह्यात लोकसभेची निवडणूक आहे. निश्चित मतदारसंध्येत ३३ लाख २२ हजार ९६५ पुरूष मतदार तर २७ लाख ७१ हजार महिला मतदार आहेत. तीन हजार ८८३ दिव्यांग मतदार, मतदार यादीमध्ये चिन्हांकित केलेले आहे.तृतियपंती ३४० मतदार आहेत. जिल्ह्यात ५२ लाख ४४ हजार ५३० मतदारांचे यादीत छायाचित्र आहेत. तर ५३ लाख २३ हजार २३५ मतदारांकडे ओळखपत्र असल्याचे निश्चित झाले आहेत.

ठळक मुद्देया चौथ्या टप्यातील निवडणुकीसाठी ६० लाख ९४ हजार ३०८ मतदाराना मतदान करता येईल. सुमारे ७१८ पोलीस अधिकारी तर आठ हजार ३६० पोलीस कर्मचा-यांचे मनुष्यबळजिल्ह्यात सहा हजार ४८८ मतदानकेंदजिल्ह्यात सुमारे १४ हजार ६३४ बॅलेड युनिटसह कंट्रोल युनिट आठ हजार ३६८ असून नऊ हजार २९९ व्हीव्हीपॅट आदी

ठाणे : जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तीन लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी २९ एप्रिल रोजी मतदान आहे. या चौथ्या टप्यातील निवडणुकीसाठी ६० लाख ९४ हजार ३०८ मतदाराना मतदान करता येईल. नोंदणी सुरू असल्यामुळे या मतदारसंख्येत वाढ होणार असल्याचे सुतोवाच जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. याशिवाय ठाणे या निवडणुकीला आयटी अ‍ॅप्लेकेशन्स म्हणजे मोबाईल अ‍ॅपचा प्रथम वापर होणार आहे. आचारसंहिता भंगची तक्रार अ‍ॅपव्दारे करताच अवघ्या १०० मिनिटात म्हणजे सुमारे दीड तासात त्यावर कारवाई होऊन संबंधीतास कळविले जाणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.या निवडणुकीसाठी आयटी अ‍ॅप्लीकेशनचा मोठ्याप्रमाणात वापर होणार आहे. यासाठी वेगवेगळे ‘अ‍ॅप’चा वापर सर्वसामान्य लोकाना मोबाईलवर करता येणार आहे. यामध्ये ‘सी’ व्हीजीनल अ‍ॅपव्दारे नागरिकाना निवडणूक निरिक्षकाची भूमिका पार पाडता येईल. ज्या ठिकाणी आचारसंहितेचाभंग झालेल्याचे लक्षात येताच, त्याचा व्हीडीओ, छायाचित्र या सीअ‍ॅपव्दारे सेंड करताच अवघ्या दीड तासाच्या कालावधीत संबंधीत तक्रारीस अनुसरून जिल्हापातळीवरून कारवाई होईल. जिल्हास्तरावर याची दखल न घेतल्यास ही तक्रार निवडणूक आयोगाकडे तत्काळ नोंदवल्या जाईल आणि कारवाई केली जाईल. या तक्रारदाराचे नाव गुपीत ठेवले जाईल. मात्र तक्रारदाराने सोसिअल मेडीवर तक्रार केल्यात झालेली कारवाई देखील संबंधीताच्या नावासह जाहीर होईल. या सीअ‍ॅपप्रमाणेच समाधान अ‍ॅपचा देखील वापर नागरिकाना तक्रारीसाठी करता येईल. सुविधा अ‍ॅपव्दारे मतदाराना वाहन सुविधेसह पाणी, स्वच्छता आदींची माहिती मिळवता येईल. याशिवाय सुगम अ‍ॅपव्दारे राजकीय पक्षांना सभांसाठी सार्वजनिक ठिकाणाच्या मैदानांची बुकींसह जाहिराती ठिकाणाची बूक करणे शक्य होणार आहे.या निवडणुकीत या आयटी अ‍ॅप्लीकेशन मध्ये १९५० या अ‍ॅप सुविधेवर मतदारास यादीतील नावासह स्वत:च्या मतदान केंद्राची माहिती घेता येणार आहे. जुलै २०१८ मध्ये अ‍ॅप उपलब्ध झाले असून त्यांचा वापर प्रमाणेच यादीत नाव शोधण्यासह मतदान केंद्राच्या माहिती १९५० या क्रमाकाच्या हेल्पलाईनव्दारे, सी व्हीजिल मोबाईल अ‍ॅप, भरारी पथके, सीसीटीव्ही यंत्रणा अशा विविध तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देखरेख व नियंत्रण ठेवले जाईल. जिल्ह्यात आचारसंहितेचे काटेकारपणे पालन करण्यासाठी ७२ भरारी पथके नेमली असून २१ व्हििडओ देखरेख पथके, तसेच ७२ स्थिर देखरेख पथके असणार आहेत. सुमारे ६२ हजार कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळाचा वापर केला जाणार आहे. या निवडणूक कामांत हयगय करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल असेही नार्वेकर यांनी सांगितले.या पत्रकार परिषदेस ठाण्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार, भिवंडीचे निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे, कल्याणचे निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजी कादबाने , उप जिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा सोमाणी आरोलकर आदींची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात ही पहिली पत्रकार परिषद पार पडली. आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत जिल्ह्यातील निवडणूक खर्चावर देखरेख व नियंत्रण ठेवण्यात येत आहे. याकरीता जिल्हास्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. राजकीय पक्षांच्या व उमेदवारांच्या जाहिराती प्रमाणकिरण करण्यासाठी जिल्हास्तरावर माध्यम प्रमाणकिरण व संनियंत्रण समिती स्थापन झाली आहे. जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षाना देखील या आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत माहिती देण्यात आली आहे. राजकीय पक्षांनी व उमेदवारांनी ‘‘काय करावे किंवा करु नये’’ आदींची माहिती वेबसाईटवर उपलब्ध केली आहे.* तिन्ही लोकसभा मतदारसंघासाठी ६०९४३०८ मतदार -जिल्हह्यातील तिन्ही लोकसभा मतदार संघासाठी आजमितीस ६० लाख ९४ हजार ३०८ मतदार निश्चित आहेत. २०१४च्या निवडणुकीच्या तुलनेत सुमारे पाच लाख ८० हजार ७८३ मतदारांची वाढ झाली. ठाणे - पालघर जिल्हा विभाजनानंतरही पहिली स्वतंत्र ठाणे जिल्ह्यात लोकसभेची निवडणूक आहे. निश्चित मतदारसंध्येत ३३ लाख २२ हजार ९६५ पुरूष मतदार तर २७ लाख ७१ हजार महिला मतदार आहेत. तीन हजार ८८३ दिव्यांग मतदार, मतदार यादीमध्ये चिन्हांकित केलेले आहे.तृतियपंती ३४० मतदार आहेत. जिल्ह्यात ५२ लाख ४४ हजार ५३० मतदारांचे यादीत छायाचित्र आहेत. तर ५३ लाख २३ हजार २३५ मतदारांकडे ओळखपत्र असल्याचे निश्चित झाले आहेत.* इव्हीएम मशीन्स, व्हीव्हीपॅटची उपलब्धता -जिल्ह्यात सहा हजार ४८८ मतदानकेंद आहेत. शहरी भागात एक हजार ४०० मतदारासाठी तर ग्रामीणमध्ये एक हजार २०० मतदारासाठी मतदान केंद्र निश्चित केले आहेत. शेवटच्या मुदतीपर्यंत मतदार नोंदणीनुसार सहायकारी मतदान केंद्रांची वाढ करणे शक्य होणार आहे. या मतदान केंद्रांच्या इव्हीएम मशीन्सचे देखील नियोजन केले आहे.जिल्ह्यात सुमारे १४ हजार ६३४ बॅलेड युनिटसह कंट्रोल युनिट आठ हजार ३६८ असून नऊ हजार २९९ व्हीव्हीपॅट आदी यंत्र उपलब्ध आहेत.* पोलीस बळाच उपलब्धता तैनात -निवडणुका व्यवस्थित पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय, ठाणे आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालय यांच्यासमवेत सुमारे ५ ते ६ बैठका घेण्यात आल्या. सुमारे ७१८ पोलीस अधिकारी तर आठ हजार ३६० पोलीस कर्मचा-यांचे मनुष्यबळ जिल्ह्यात तैनात आहे.

टॅग्स :thaneठाणेcollectorजिल्हाधिकारी