परदेशातून आलेल्या ५ जणांना कोरोना, तर ५ जण बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2020 19:50 IST2020-12-27T19:49:55+5:302020-12-27T19:50:11+5:30
Corona Virus news: एकूण ५५ जणांची कोविड चाचणी करण्यात आली आहे. त्याचे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ.प्रमोद पडवळ यांनी दिली आहे.

परदेशातून आलेल्या ५ जणांना कोरोना, तर ५ जण बेपत्ता
मीरारोड - मीरा-भाईंदर शहरात परदेशातून आलेल्या ५ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली असून ५ व्यक्तींचा शोध लागत नसल्याने खळबळ उडाली आहे.
२४ नोव्हेंबरपासून आतापर्यंत ७५ लोक ब्रिटनमधून शहरात आले आहेत. यातील १५ व्यक्ती शहरातून बाहेर गेल्या असून ५ जणांचा अद्यापही शोध लागलेला नाही. ५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून त्यांना रामदेव पार्क येथील कोविड केअर मध्ये दाखल केले आहे. या ५ कोरोना रुग्णांचे नमुने पुन्हा घेऊन पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत.
एकूण ५५ जणांची कोविड चाचणी करण्यात आली आहे. त्याचे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ.प्रमोद पडवळ यांनी दिली आहे. ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्यामुळे परदेशातून आलेल्या प्रवाशांच्या आरोग्य तपासणीवर पालिकेने भर दिला आहे.