शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

४०३ जणांना डेंग्यूची लागण

By admin | Updated: February 9, 2016 02:18 IST

जिल्ह्यातील सहा महापालिका, दोन नगरपालिका क्षेत्रातील बहुतांशी ठिकाणी साफसफाईचा अभाव, ठिकठिकाणी पडलेला कचरा यामुळे हिवताप आणि डेंग्यू या आजारांचा प्रादुर्भाव वाढल्याचे

- सुरेश लोखंडे,  ठाणेजिल्ह्यातील सहा महापालिका, दोन नगरपालिका क्षेत्रातील बहुतांशी ठिकाणी साफसफाईचा अभाव, ठिकठिकाणी पडलेला कचरा यामुळे हिवताप आणि डेंग्यू या आजारांचा प्रादुर्भाव वाढल्याचे एका अहवालावरून उघड झाले. वर्षभरात हिवतापाचे १२६ रुग्ण असतानाच डेंग्यूचे सर्वाधिक ४०३ रुग्ण आढळले. यातील सुमारे २८ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. बदलत्या हवामानामुळे जिल्ह्यातील वायरल इन्फेक्शन सतत वाढत आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत तापाच्या रुग्णांची संख्या शहरासह ग्रामीण भागात वाढत आहे. यात थंडीतापासह डेंग्यूच्या संशयित रुग्णांची संख्या आढळत आहे. वर्षभरात हिवताप व डेंग्यूचे सुमारे ५२९ संशयित आढळले. डेंग्यूच्या या संशयितांमधील दगावलेल्या २८ जणांपैकी महापालिका क्षेत्रातील १५ रुग्ण असून नगरपालिका क्षेत्रातील सहा, आदिवासी भागातील तीन आणि ग्रामीण भागातील चार रुग्ण दगावल्याची गंभीर बाब निदर्शनात आली आहे. हिवतापापेक्षा वर्षभरात जीवघेण्या डेंग्यूच्या संशयित रुग्णांची स्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे महापालिकांसह अन्यही ठिकाणी तो वाढत असल्याचे म्हणणे वावगे नसल्याचे बोलले जात आहे. संशयितांमधून सुमारे ३२ डेंग्यूचे रुग्ण निश्चित करता आले आहेत. यातील सहा रुग्ण दगावल्याची नोंद आहे. तर हिवतापाच्या केवळ तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. पण, ही हास्यास्पद बाब असली तरी प्रत्यक्षात दगावलेल्या २८ पैकी काही पट रुग्ण वर्षभरात दगावले आहेत. परंतु, त्यास विहीत नमुन्यात नोंदण्याची संधी मिळाली नसल्याचे बोलले जात आहे.