अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिराच्या गाभाऱ्यात 3 फूट पाणी; शिवलिंग देखील आले पाण्याखाली 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 02:04 PM2021-07-19T14:04:13+5:302021-07-19T14:10:13+5:30

मंदिर भाविकांसाठी बंद असले तरी मंदिराच्या गाभाऱ्यात दररोज विधिवत पूजा केली जाते.

3 feet of water in the gabhara of the ancient Shiva temple of Ambernath; Shivling also came under water | अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिराच्या गाभाऱ्यात 3 फूट पाणी; शिवलिंग देखील आले पाण्याखाली 

अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिराच्या गाभाऱ्यात 3 फूट पाणी; शिवलिंग देखील आले पाण्याखाली 

Next

अंबरनाथ: 48 तासात पासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे वालधुनी नदीला पूर आला असून या वालधुनी नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या प्राचीन शिवमंदिराच्या गाभार्‍यात देखील पाणी शिरले आहे. त्यामुळे गाभाऱ्यातील शिवलिंग देखील पाण्याखाली आले आहेत.

गेल्या दोन दिवसापासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे वालधुनी नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीकिनारी असलेल्या नागरी वस्तीना सतर्कतेचा इशारा पालिकेच्या वतीने देण्यात आले आहे. याच उल्हास नदीच्या काठावर असलेल्या अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराला देखील पुराचा तडाखा बसला आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात तीन फूट पाणी भरल्याने मंदिरातील शिवलिंग पाण्याखाली आले आहे.

मंदिर भाविकांसाठी बंद असले तरी मंदिराच्या गाभाऱ्यात दररोज विधिवत पूजा केली जाते. शिवलिंग पाण्याखाली आलेले असताना देखील मंदिराचे नियमित पूजा अजूनही सुरू असल्याचे मंदिर प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर देखील पाणी भरले असून वालधुनी नदीवरील दोन लहान पूल देखील पाण्याखाली आले आहेत. त्यामुळे मंदिराकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.

Web Title: 3 feet of water in the gabhara of the ancient Shiva temple of Ambernath; Shivling also came under water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.