Video : शाळेचे प्लास्टर पडून ३ मुले जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 18:40 IST2019-06-19T13:53:49+5:302019-06-19T18:40:42+5:30
उल्हासनगरची घटना : स्लॅब पडल्याच्या अफवेमुळे पालकांमध्ये भीती

Video : शाळेचे प्लास्टर पडून ३ मुले जखमी
उल्हासनगर - कॅम्प नं-२ परिसरातील झुलेलाल शाळेच्या इमारतीचे मंगळवारी प्लास्टर पडून तीन मुले किरकोळ जखमी झाली. शाळा प्रशासनाने मुलांवर प्राथमिक उपचार करून घरी पाठवले.
उल्हासनगरमधील कॅम्प नं-२ परिसरात झुलेलाल शाळा असून शाळा इमारतीचा स्लॅब कोसळल्याची अफवा शहरात पसरली. स्लॅब पडल्याच्या वृत्तामुळे स्थानिक नेत्यांसह पालिका अतिक्रमण विरोधी पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र शाळा इमारतीच्या एका वर्गखोलीचे प्लास्टर पडल्याचे निदर्शनास आली. या दुर्घटनेत किरकोळ जखमी झालेल्या ३ मुलांना प्राथमिक उपचार करून घरी सोडल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली. तसेच शहरातील अनेक शाळा इमारतीला पावसाळयात गळती लागून धोकादायक झाल्या आहेत.
शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी शालेय मुलांच्या सुरक्षेसाठी पालिकेने शाळा इमारतीचे ऑडिट सक्तीने करावे अशी मागणी आयुक्तांकडे करणार असल्याचे सांगितले. झुलेलाल शाळा प्रशासनाने इमारतीचे एका ठिकाणचे प्लास्टर पावसामुळे पडले असून इमारत पूर्णत: सुरक्षित असल्याचे सांगितले.\