शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

बेड रिकामे असतानाही २३ कोटींचे नवे हॉस्पिटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 23:44 IST

‘प्रतापी’ लोकप्रतिनिधीचा हट्ट : उधळपट्टीला संजय वाघुले यांनी केला विरोध

ठाणे : ठामपाने कोविड रुग्णांसाठी उभारलेले ग्लोबल इम्पॅक्ट हब, भूमिपूत्र हॉस्पिटल व इतर ठिकाणी पेशंटअभावी तीन हजारांहून अधिक बेड रिकामे आहेत. बुश कंपनीच्या जागेवरील हॉस्पिटलमध्ये उद्घाटनानंतर केवळ तीन रुग्ण आहेत. परंतु, तरीही ओवळा-माजिवड्याच्या एका ‘प्रतापी’ लोकप्रतिनिधीच्या हट्टापायी मनपाने व्होल्टास कंपनीच्या जागेवरील १,०८५ बेडच्या हॉस्पिटलची लगीनघाई करून त्यासाठी २३ कोटी रुपयांचा कार्यादेश दिला आहे. याला मनपातील भाजपचे गटनेते संजय वाघुले यांनी आक्षेप घेऊन बुधवारी तीव्र विरोध केला आहे.मनपाने बाळकूम येथील ग्लोबल हब येथे १,०२४ बेडचे हॉस्पिटल उभारले आहे. त्यात १५ कोटी खर्चून आणखी ३०० रुग्णांची क्षमता वाढविली गेली. कळवा येथे भूमिपूत्र हॉस्पिटलमध्ये ६४१, कौसा येथील हॉस्पिटलमध्ये ३९४, ‘बुश’च्या कम्पाउंडमधील रुग्णालयात ४५६ बेडची क्षमता आहे. ज्युपिटर पार्किंग लॉटमधील १,३५० बेडचे हॉस्पिटल पूर्ण झाले. तर, पाच दिवसांपूर्वी झी व मनपाने बोरिवडे येथे ३०६ बेडचे रुग्णालय सुरू केले आहे.शहरातील रुग्णसंख्या घटत आहे. १५ डिसेंबरला सायंकाळी ‘ग्लोबल’मध्ये ९०५, कौसा स्टेडियम येथे ३४१, भूमिपूत्र हॉस्पिटलमध्ये ५७५ बेड रिकामे आहेत. बोरिवडे येथील हॉस्पिटलमध्ये अद्यापि एकही रुग्ण दाखल झालेला नाही. तर शहरातील १८ खाजगी रुग्णालयांत ७७५ बेड व मनपाच्या हॉस्पिटलमध्ये २,२९४ जागा रिक्त आहेत.  असे असतानाही मनपाने ‘व्होल्टास’च्या जागेवरील हॉस्पिटल सुरू करण्यासाठी लगीनघाई सुरू केली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.नियमांची पायमल्लीसिडकोच्या १३ कोटींच्या निधीतून ‘व्होल्टास’च्या जागेवर १,०८५ बेडचे हॉस्पिटल उभारण्यात येणार होते. मात्र, या हॉस्पिटलचा खर्च १३ कोटींवरून २३ कोटींपर्यंत फुगविला. विशिष्ट कंत्राटदारावर मेहेरनजर ठेवण्यासाठी  नियमांची पायमल्ली केली, असा आरोप वाघुले यांनी केला.