राज्यशासनाच्या माध्यमातून ठाणे महापालिकेस अनुदान स्वरुपात 225 कोटींचा निधी द्यावा- नरेश म्हस्के
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2020 19:31 IST2020-08-24T19:30:58+5:302020-08-24T19:31:13+5:30
महापौर नरेश म्हस्के यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

राज्यशासनाच्या माध्यमातून ठाणे महापालिकेस अनुदान स्वरुपात 225 कोटींचा निधी द्यावा- नरेश म्हस्के
ठाणे: ठाणे शहरात कोरोनावर मात करण्यासाठी किंबहुना कोरोनाचा नायनाट करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून विविध उपाययोजना वेळोवळी राबविण्यात आल्या. यामध्ये मुंबईच्या धर्तीवर स्वतंत्र कोविड रु ग्णालयाची निर्मिती करणो, विलगीकरण कक्ष उभारणो, आवश्यक तज्ञ डॉक्टांराची नियुक्ती करणो, औषधे उपलब्ध करणो, रुग्णवाहिका उपलब्ध करणे, विलगीकरण कक्षातील नागरिकांना आवश्यक सेवासुविधा पुरविणो आदी कामे महापालिका प्रशासनाने योग्य प्रकारे केलेली आहे.
परंतु महापालिकेच्या उपलब्ध आर्थिक तरतुदीमधूनच हा खर्च करण्यात आलेला आहे. महापालिकेतील इतर दैनंदिन कामे देखील करणो आवश्यक आहे, कोरोना काळात महापालिकेच्या उत्पन्नात घट झाली असून महापालिकेकडे अन्य कोणतेही उत्पन्नाचे स्त्रोत नाही, याचा परिणाम इतर नागरी कामांवर होत आहे. त्यामुळे भविष्यात ठाण्याच्या विकासकामांवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ठाणो महापालिकेला राज्य शासनाच्या माध्यमातून अनुदान स्वरुपात 225 कोटींचा निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी महापौर नरेश म्हस्के यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे सोमवारी केली.
कोरोना व त्या संबंधी उपाययोजना करण्यासाठी महापालिकेला 225 कोटी रु पयांचा खर्च अपेक्षित आहे. आजवर महापालिकेने कोरोना संदर्भातील कामांसाठी कोट्यावधी रु पये खर्च केलेले आहेत. त्यामुळे महापालिकेची सद्य:स्थितीतील आर्थिक परिस्थिती विचारात घेता, महानगरपालिकेतील अन्य नागरी कामे आथिकदृष्ट्या करणो शक्य नाही. तरी राज्यशासनाच्या माध्यमातून कोरोना व त्यासंबंधीतील कामे करण्यासाठी अनुदान स्वरु पात रु पये 225 कोटींची आर्थिक मदत उपलब्ध करु न मिळणोबाबत योग्य ते सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.