शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

ठामपा गोळा करणार २०० मेट्रिक टन कचरा, झोपडपट्टी विभागासाठी ६५० कचरावेचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 03:06 IST

शहरातील ज्या भागांमध्ये घंटागाडी पोहोचू शकत नाही, त्या झोपडपट्टी भागातील कचरा गोळा करण्यासाठी कचरावेचक संकल्पना पालिकेने पुन्हा एकदा पुढे आणली आहे.

ठाणे : शहरातील ज्या भागांमध्ये घंटागाडी पोहोचू शकत नाही, त्या झोपडपट्टी भागातील कचरा गोळा करण्यासाठी कचरावेचक संकल्पना पालिकेने पुन्हा एकदा पुढे आणली आहे.हे कचरावेचक झोपडपट्टी भागातील दोन लाख घरांमध्ये जाऊन ६५० कचरावेचक दिवसाला प्रत्येकी १५०० घरांतून तब्बल २०० मेट्रिक टन कचरा गोळा करणार आहेत. परंतु, रोजच्या रोज हा कचरा गोळा केला जातो किंवा नाही, याची माहिती पालिकेला केवळ एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. प्रत्येक घरासाठी एक क्यूआर कोडकार्ड दिले जाणार असून कचरा उचलताना तो कचरावेचकाच्या मोबाइलवर स्कॅन केला जाणार आहे. त्यामुळे रोजच्या रोज अपडेट पालिकेला मिळणार आहे.महापालिका हद्दीत आजघडीला ७५० मेट्रिक टन कचरा निर्माण होत आहे. परंतु. त्याचे वर्गीकरण अद्यापही योग्य पद्धतीने होताना दिसत नाही. झोपडपट्टी भागात तर आजही ओला आणि सुका कचरा एकत्रितपणे दिला जात आहे. काही ठिकाणी तर घंटागाडी पोहोचत नसल्याने तो रस्त्यावरच पसरलेला असतो. त्यामुळे आता या भागात पोहोचून तो गोळा करण्यासाठी पालिकेने ही पावले उचलली आहेत. आॅगस्ट महिन्यापासून हे काम सुरू केले जाणार आहे.यापूर्वीदेखील पालिकेने कचरावेचकांची संकल्पना पुढे आणली होती. परंतु, प्रत्येक घरातून कचरा उचलला जाईलच, याची शाश्वती पालिकेला नव्हती. त्यामुळे ती बंद केली होती. आता नव्या संकल्पनेनुसार महिला बचत गट, महिला मंडळ, सामाजिक संस्था, वाल्मीकी सामाजिक संस्था, कचरावेचक संथ्यांना हे काम दिले जाणार आहे. त्यानुसार, हे कचरावेचक घरोघरी जाऊन ओला आणि सुका कचरा वेगळा गोळा करणार आहेत. शिवाय, कचरा वर्गीकरणासंदर्भात जनजागृतीदेखील करणार आहेत.केवळ जनजागृतीच केली जाणार नसून प्रत्येक घरातून कचरा गोळा केला जातो अथवा नाही, याची माहिती घेण्यासाठी एक अ‍ॅपदेखील विकसित करणार आहे. जे घरोघरी जाऊन कचरा गोळा करणार आहेत, त्यांच्या हाती स्मार्ट फोन दिला जाणार आहे. सुरुवातीला कचरा गोळा करताना ही मंडळी प्रत्येक घराची माहिती, त्याच्या मालकाचे नाव, पत्ता, मोबाइल क्रमांक घेणार आहेत.अ‍ॅपद्वारे पालिकेला मिळणार माहितीगोळा केलेली माहिती पालिकेच्या माध्यमातून एका एजन्सीकडे दिली जाणार आहे. ती या माहितीच्या आधारे अ‍ॅप विकसित करून क्यूआर कोड विकसित करणार आहे. हे क्यूआर कोडकार्ड स्वरूपात प्रत्येक घरात दिले जाणार आहे. त्यानंतर, ज्या वेळेस कचरावेचक तो गोळा करण्यासाठी घरी जाईल, त्यावेळेस आपल्याजवळील मोबाइलमध्ये क्यूआर कोड स्कॅन करणार आहे. त्यातून, पालिकेला प्रत्येक घरातून कचरा उचलल्याची माहिती मिळणार आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका