अंबरनाथमध्ये बेकायदा गतिरोधकाचे २ तरुण बळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 13:47 IST2025-10-13T13:47:08+5:302025-10-13T13:47:20+5:30
अपघातानंतर वेळेत उपचार न मिळाल्यामुळे या दोघांचाही मृत्यू झाला. याप्रकरणी बेकायदा गतिरोधक उभारणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी नातेवाइकांनी केली.

अंबरनाथमध्ये बेकायदा गतिरोधकाचे २ तरुण बळी
अंबरनाथ : बेकायदा गतिरोधकामुळे दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना अंबरनाथ पश्चिमेच्या आयटीआय समोर शनिवारी रात्री उशिरा घडली. पवन हमकारे (२३), प्रणव बोरकले (१७) अशी मृतांची नावे आहेत. आयटीआय समोर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बेकायदा गतिरोधक बांधल्यामुळे रात्रीच्यावेळी चालकांना दिसत नाही. त्यामुळे अनेक गाड्या यावरून उडतात.
अपघातानंतर वेळेत उपचार न मिळाल्यामुळे या दोघांचाही मृत्यू झाला. याप्रकरणी बेकायदा गतिरोधक उभारणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी नातेवाइकांनी केली.
पट्टे नसल्यामुळे दुर्घटना
अंबरनाथच्या आयटीआय येथे एका विद्यार्थिनीचा अपघात झाला. त्यामुळे आयटीआय प्रशासनाने गतिरोधक बसवण्याची मागणी केली होती. त्यानुसार या ठिकाणी नव्याने गतिरोधक बसविले. मात्र, त्यावर पट्टे न मारल्यामुळे हा गतिरोधक जीवघेणा ठरला.
वाहतूककोंडी
घोडबंदर येथील गायमुख घाटामध्ये डांबरीकरणाचे काम ११ ते १४ ऑक्टोबरपर्यंत हाती घेतले आहे. यामुळे अवजड वाहतूक बंद केली आहे. त्यातच रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास कंटेनर उलटल्याने दिवसभर नागरिकांना वाहतूककोंडीचा फटका बसला.