ठाण्यात डेंग्यूचे 2 तर मलेरियाचे 75 रुग्ण; पालिकेने 44 हजार 896 घरांची केली तपासणी
By रणजीत इंगळे | Updated: September 12, 2022 16:38 IST2022-09-12T16:36:59+5:302022-09-12T16:38:04+5:30
662 दूषित कंटेनरपैकी 277 कंटेनरमध्ये अळीनाशक टाकण्यात आले व 373 कंटेनर रिकामी करण्यात आले.

ठाण्यात डेंग्यूचे 2 तर मलेरियाचे 75 रुग्ण; पालिकेने 44 हजार 896 घरांची केली तपासणी
ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये ऑगस्ट 2022 मध्ये डेंग्यूचे संशयित रुग्णसंख्या 23 आणि लागण झालेले एकूण दोन रुग्ण आहेत. तर मलेरियाचे 75 रुग्ण आढळून आले व चिकनगुनियाची रुग्णसंख्या शून्य आहे. यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी गृहभेटी देऊन एकूण 44896 घरांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत 557 घरे दूषित आढळून आली. तसेच एकूण 61314 कंटेनरची तपासणी केली असता 662 कंटेनर दूषित आढळून आली.
662 दूषित कंटेनरपैकी 277 कंटेनरमध्ये अळीनाशक टाकण्यात आले व 373 कंटेनर रिकामी करण्यात आले. तसेच 04 ठिकाणी गप्पी मासे सोडण्याचे कार्यक्रम राबविण्यात आले. या अनुषंगाने दरम्यानच्या कालावधीत कार्यक्षेत्रात 50 हॅण्डपंप, ट्रॅक्टर्स-10, ई रिक्षा 6, 10 बोलेरो वाहनांमार्फत दोन सत्रात 2708 ठिकाणी औषध फवारणी आणि धुरफवारणी हॅण्डमशीनद्वारे 17946 ठिकाणी धूरफवारणी करण्यात आली असल्याचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. भिमराव जाधव यांनी सांगितले