ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना १८ हजार सानुग्रह अनुदान

By अजित मांडके | Updated: October 13, 2022 21:40 IST2022-10-13T21:37:43+5:302022-10-13T21:40:08+5:30

म्युनिसिपल लेबर युनियनने गुरुवारी वर्षा निवासाथनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली त्यानंतर ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना हे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे.

18 thousand bonus to Thane municipal employees | ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना १८ हजार सानुग्रह अनुदान

ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना १८ हजार सानुग्रह अनुदान

ठाणे : मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान जाहीर झाले आहे. त्यानंतर आता ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना सुद्धा १८ हजार रुपये सानुग्रह अनुदान मंजूर झाले आहे. मागील वर्षी १५५०० सानुग्रह अनुदान मिळाले होते यंदा त्यात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. 

म्युनिसिपल लेबर युनियनने गुरुवारी वर्षा निवासाथनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली त्यानंतर ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना हे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे.

कामगार नेते रवी राव आणि उपाध्यक्ष मोहन तिवारी यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेऊन ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाकरिता सानुग्रह अनुदान मिळणेबाबत चर्चा केली.  मुख्यमंत्री यांनी सकारात्मक भूमिका  घेऊन आयुक्त अभिजीत बांगर यांच्याबरोबर ऑनलाइन चर्चा केली व  १८ हजार सानुग्रह अनुदान सानुग्रह अनुदान मंजूर केल्याचे जाहीर केले.
 
Web Title: 18 thousand bonus to Thane municipal employees