कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी देऊन १६ वर्षीय तरुणीचा विनयभंग, आरोपीला बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 01:39 IST2017-11-17T01:38:40+5:302017-11-17T01:39:07+5:30

कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी देऊन एका १६ वर्षीय तरुणीचा विनयभंग करणा-या अमित गुप्ता (१९) याला कापूरबावडी पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे.

The 16-year-old girl was allegedly molested and threatened to kill her family members | कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी देऊन १६ वर्षीय तरुणीचा विनयभंग, आरोपीला बेड्या

कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी देऊन १६ वर्षीय तरुणीचा विनयभंग, आरोपीला बेड्या

ठाणे : कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी देऊन एका १६ वर्षीय तरुणीचा विनयभंग करणा-या अमित गुप्ता (१९) याला कापूरबावडी पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. त्याला २९ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
माजिवडा सेवा रस्त्याच्या कडेला राहणाºया या मुलीची भिवंडीच्या काल्हेर भागात राहणाºया अमितबरोबर काही दिवसांपूर्वीच ओळख झाली होती. याच ओळखीचा फायदा घेऊन १५ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास त्याने तिला तिच्या घराजवळील रस्त्यातच थांबवून तिचा हात पकडला. तिच्या हातातील मोबाइल जबरदस्तीने हिसकावून भावाला आणि कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी देऊन तिला त्याच्या मोटारसायकलवर बसण्यास भाग पाडले. नंतर, घोडबंदर रोडवरील फाउंटन हॉटेल परिसरात नेऊन दमदाटी करून तिचा विनयभंग केला. छेडछाड करून तिच्या मोबाइलमधून अन्य कोणाला तरी मेसेज पाठवला. या सर्व प्रकारानंतर तिने त्याच्याविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर त्याला अटक केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बन्सी बारावकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title: The 16-year-old girl was allegedly molested and threatened to kill her family members