दिव्यातील तलावात १६ वर्षाचा मुलगा बुडाला, शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2021 19:53 IST2021-01-10T19:52:53+5:302021-01-10T19:53:26+5:30

Drowning : शिळ तसेच मुंब्रा अग्निशमन दलाचे जवान त्याचा शोध घेत असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली. 

A 16-year-old boy drowned in a lake in Divya | दिव्यातील तलावात १६ वर्षाचा मुलगा बुडाला, शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु 

दिव्यातील तलावात १६ वर्षाचा मुलगा बुडाला, शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु 

ठळक मुद्दे सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत मुलगा सापडलेला नव्हता. त्याचा शोध घेण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

मुंब्राः दिव्यातील बेडेकर नगर येथील खडवली देवी चाळीत रहात असलेला आर्यन चिपी हा १६ वर्षाचा अल्पवयीन मुलगा त्याच्या मित्रासह रविवारी दुपारी पोहण्यासाठी येथील आगासन येथील तलावात गेला होता. तेथील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे आणि दम लागल्यामुळे तो तलावात बुडाला. शिळ तसेच मुंब्रा अग्निशमन दलाचे जवान त्याचा शोध घेत असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली. 

आज रविवारी दुपारीन तीन वाजण्याच्या सुमारास हा मुलगा त्याच्या तीन चार मित्रांसह तलावात पोहायला गेला होता. मात्र पोहताना तलावात मध्यभागी असताना त्याला दम लागल्याने तो पाण्यात बुडाला. सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत मुलगा सापडलेला नव्हता. त्याचा शोध घेण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

Web Title: A 16-year-old boy drowned in a lake in Divya