शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
4
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
5
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
6
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
7
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
8
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
9
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
10
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
11
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
12
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
13
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
14
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
15
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
16
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
17
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
18
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
19
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
20
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच

भिवंडीत 16 गोदामे जळून खाक, कोट्यवधी रुपयांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2017 12:12 IST

सुरक्षेचे कोणतेही उपाय न योजता आणि क्षमतेपेक्षा अधिक सामान भरून ठेवल्यामुळे कायम वादग्रस्त ठरलेल्या भिवंडीतील गोदामांना बुधवारी सकाळी लागलेल्या आगीत १६ गोदामे जळून खाक झाली.

भिवंडी : सुरक्षेचे कोणतेही उपाय न योजता आणि क्षमतेपेक्षा अधिक सामान भरून ठेवल्यामुळे कायम वादग्रस्त ठरलेल्या भिवंडीतील गोदामांना बुधवारी सकाळी लागलेल्या आगीत १६ गोदामे जळून खाक झाली. यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. अग्निप्रतिबंधक साधने नसल्याने सुरुवातीला एका गोदामाला लागलेली आग पसरत गेली. त्यातील प्लॅस्टिक आणि इतर साहित्याचा विषारी धूर यामुळे वातावरण प्रदूषित झाले. सात तासांच्या अथक परिश्रमानंतर संध्याकाळी आग आटोक्यात आणण्यात यश आले. यात जीवितहानी झाली नाही.

मुंबई-नाशिक मार्गाजवळच्या ओवळी गावाच्या हद्दीत सागर कॉम्प्लेक्समधील चेक पॉइंट या गोदामाला बुधवारी सकाळी १०च्या सुमारास आग लागली. वाºयामुळे तिचा धोका वाढत गेला. एकेक करत सायंकाळपर्यंत १६ गोदामे आगीच्या भक्षस्थानी पडली. या भागांत अनेक गोदाम असून, बºयाच ठिकाणी सुरक्षेची कोणतीही उपाययोजना नाही. आज लागलेल्या आगीमुळे येथील गोदाम व कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

जीवितहानी नाही : गोदामे जळून खाक झाल्याने शेकडो कामगार बेरोजगार झाल्याची माहिती कामगारांनी दिली. आगीमुळे परिसरात विषारी धूर पसरला होता. धुरामुळे दृश्यमानता कमी झाल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझविण्यात अडथळा येत होता. वाºयामुळे धूर महामार्गावर येत असल्याने ठिकठिकाणी वाहतूककोंडी झाली. आग विझविण्यासाठी भिवंडीसोबतच ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर येथून बंब मागविण्यात आले होते. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

राजकीय आशीर्वादाचा फटकाया परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत गोदामे आहेत. परवानगी न घेता, त्यात माल साठविला जातो. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचे, ती तोडण्याचे आणि जमिनी मोकळ्या करण्याचे प्रयत्न तत्कालीन जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी सुरू केले होते. मात्र, गोदाम मालकांनी राजकीय दबाव आणून ही कारवाई थांबविली. त्याचा फटका मोठ्या लोकसंख्येला बसला. जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल विभागासह अन्य सरकारी खात्यांचे आता या गोदामांवर कोणतेही नियंत्रण नाही. त्यामुळे तेथे वारंवार आग लागण्याच्या घटना घडत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. विषारी वायूमुळे परिसरातील गावकरी आणि कामगारांचा जीव धोक्यात आला आहे. 

टॅग्स :Bhiwandiभिवंडी