डोंबिवलीत पत्ता विचारण्याच्या बहाण्याने १४ वर्षीय मुलीचा विनयभंग, आरोपी अटक
By प्रशांत माने | Updated: June 23, 2023 17:40 IST2023-06-23T17:39:04+5:302023-06-23T17:40:12+5:30
१४ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार पुर्वेकडील गोपाळनगरमध्ये शुक्रवारी सकाळी सव्वा अकराच्या दरम्यान घडला.

डोंबिवलीत पत्ता विचारण्याच्या बहाण्याने १४ वर्षीय मुलीचा विनयभंग, आरोपी अटक
डोंबिवली: पत्ता विचारण्याच्या बहाण्याने १४ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार पुर्वेकडील गोपाळनगरमध्ये शुक्रवारी सकाळी सव्वा अकराच्या दरम्यान घडला. योना बेन्जामीन (वय ५९) असे आरोपीचे नाव असून त्याच्याविरोधात पीडीतेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून टिळकनगर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा नोंद झाला आहे.
आरोपी बेन्जामीन हा पाथर्ली परिसरात राहणारा असून पीडीत मुलगी तिच्या घरी जात असताना इमारतीच्या जिन्यामध्ये तिला अडवत पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्याने तिचा विनयभंग केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. विनयभंगाचा गुन्हा दाखल करून बेन्जामीनला अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक अजय आफळे यांनी दिली.