मुंब्र्यात चाळीखालची जमिन खचली, 12 कुटुंबे निष्कासित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2019 00:11 IST2019-09-04T00:11:00+5:302019-09-04T00:11:12+5:30

चाळीत रहाणारी सर्व कुटुंबे भाडेतत्वावार तेथे रहात होती,तसेच चार वर्षापूर्वी ती धोकादायक असल्याचे ठामपाने जाहिर केले होते.

12 tracts of land destroyed in Mumbra | मुंब्र्यात चाळीखालची जमिन खचली, 12 कुटुंबे निष्कासित

मुंब्र्यात चाळीखालची जमिन खचली, 12 कुटुंबे निष्कासित

मुंब्राः काही दिवसां पासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे मुंब्रा बायपास जवळील सैनिक नगर परीसरातील 22 रुम असलेल्या  आरके चाळीच्या काही घरां खालची जमिन खचल्याचे सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास  निदर्शनास आले.सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून ठामपाच्या मुंब्रा प्रभाग समितीच्या अधिका-यानी चाळीत रहाणा-या 12 कुटुंबांना निष्कासित केले आहे.

चाळीत रहाणारी सर्व कुटुंबे भाडेतत्वावार तेथे रहात होती,तसेच चार वर्षापूर्वी ती धोकादायक असल्याचे ठामपाने जाहिर केले होते. कुटुंबे निष्कासीत झाल्यानंतर ती  पाडण्याचे काम सुरु करण्यात आले असल्याची  माहिती मुंब्रा प्रभाग समितीच्या अतिक्रमण विरोधी पथकाचे लिपिक जितेंद्र साबळे यांनी लोकमतला दिली.

Web Title: 12 tracts of land destroyed in Mumbra