ठाणे जिल्ह्यात ६,४६८ पैकी ११७ कारखाने बंद, हजारो कुटुंबियांवर येणार उपासमारीची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 14:19 IST2025-12-30T14:19:34+5:302025-12-30T14:19:54+5:30
औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाने यंदाच्या जिल्हा सामाजिक व आर्थिक समालाेचन अहवालात ही माहिती दिली आहे.

ठाणे जिल्ह्यात ६,४६८ पैकी ११७ कारखाने बंद, हजारो कुटुंबियांवर येणार उपासमारीची वेळ
सुरेश लाेखंडे -
ठाणे : ठाणे जिल्ह्यात नोंदणीकृत ६,४६८ कारखान्यांपैकी तब्बल ११७ कारखाने बंद आहेत. यामुळे हजारो कुटुंबांवर उपासमारीची वेळ आल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाने यंदाच्या जिल्हा सामाजिक व आर्थिक समालाेचन अहवालात ही माहिती दिली आहे.
दाेन लाख सात हजार ७४८ मजूर काम करत असल्याचे दिसतात. परंतु, बंद पडलेल्या कारखान्यांची संख्या पाहता यातील अनेकांच्या रोजगारावर गदा येणार आहे. वस्त्रोद्योगात १८,६१०, रसायन उद्योगात २७,३२३, पेट्रोलियम, रबर उत्पादनात ८,२०१ मजूर कार्यरत असले, तरी या क्षेत्रांमध्ये निर्माण झालेल्या अस्थैर्याने मजुरांच्या मनात असुरक्षिततेची भावना आहे. गुंतवणुकीत घट, कच्चा माल खर्चातील वाढ, प्रशासकीय विलंब आदी घटकांनी मिळून उद्योगांचे भविष्य धोक्यात आणले. औद्योगिक पाया ढासळत असल्याचे लक्षात घेत प्रशासनाने हस्तक्षेप करण्याची अपेक्षा व्यक्त हाेत आहे.
कारखाने बंद पडण्याचे प्रमाण वाढत असताना फक्त १,१५४ कारखानेच योग्य प्रपत्रे सादर करतात, तर ४,३९७ कारखान्यांची वास्तविक स्थिती अस्पष्ट आहे. बाहेरून चाके फिरताना दिसली तरी उत्पादन, वेतन आणि कामगारांची सुरक्षा अंधारात आहे.
कारखान्याचा बंद प्रपत्र न प्रकार पडलेले पाठवलेले
खाद्य उत्पादने, ८ २५६
पेये व तंबाखूची
उत्पादने
वस्त्रोद्योग १४ १०३०
(परिधान करण्याची
वस्त्रे धरून)
लाकूड व लाकडाची ० १७१
उत्पादने
कागदाची उत्पादने, ३ ९६
मुद्रण व प्रकाशन इ.
कातडी कमावणे व ० ५०
चामड्याची उत्पादने
यंत्रे व यंत्रसामग्री ५ ३०२
कारखान्याचा बंद प्रपत्र न प्रकार पडलेले पाठवलेले
रसायने व १२ ४३७
रासायनिक उत्पादने
पेट्रोलियम, रबर ५ १८८
उत्पादने
अधातू खनिज ६ ७९
उत्पादने
मूलभूत धातू, ५ ११९
धातूची उत्पादने
परिवहन सामग्री ० ९
इतर वस्तूनिर्माण ० ५३
उद्याेग
इतर कारखाने ५९ १७०६