पालघर जि.प.च्या १०३ प्राथमिक शिक्षकांची ठाणे जिल्ह्यात बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 20:22 IST2019-05-09T20:05:39+5:302019-05-09T20:22:12+5:30
जिल्हा विभाजनानंतर दोन्ही जिल्ह्यात आकृतीबंधनुसार शिक्षकांची पदे समान ठेवण्याच्या निर्णयास मागील वर्षी झाला. त्यास अनुसरून ठाणे जिल्ह्यातील काही शिक्षकांची पालघर मध्ये बदली करण्यात आली. मात्र पालघर जिल्ह्यात शिक्षकांची कमतरता असल्यामुळे त्यावेळी शिक्षकांच्या बदल्या पालघर जिल्हा परिषदेने थांबवल्या होत्या.

तत्काली रखडलेल्या या १०३ शिक्षकांच्या बदल्या पालघर जिल्ह़ा परिषदेने ठाणे जिल्ह्यात केल्या
ठाणे : पालघर जिल्ह्यातशिक्षकांची कमतरता असल्यामुळे जानेवारी बदली झालेल्या सुमारे १०३ प्राथमिक शिक्षकांचीठाणेजिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये केली नव्हती. तत्काली रखडलेल्या या १०३ शिक्षकांच्या बदल्या पालघर जिल्ह़ा परिषदेने ठाणे जिल्ह्यात केल्या असून ते शिक्षक जिल्हा परिषदेत हजर झाले आहेत.
जिल्हा विभाजनानंतर दोन्ही जिल्ह्यात आकृतीबंधनुसार शिक्षकांची पदे समान ठेवण्याच्या निर्णयास मागील वर्षी झाला. त्यास अनुसरून ठाणे जिल्ह्यातील काही शिक्षकांची पालघर मध्ये बदली करण्यात आली. मात्र पालघर जिल्ह्यात शिक्षकांची कमतरता असल्यामुळे त्यावेळी शिक्षकांच्या बदल्या पालघर जिल्हा परिषदेने थांबवल्या होत्या. आता त्यांच्याकडे पुरेसे शिक्षक असल्यामुळे जिल्हा विभाजनानंतर आवडीच्या जिल्ह्यात राहणे पसंत करणाऱ्या विकल्पानुसार १० शिक्षकांच्या बदल्या रखडल्या होत्या. त्या शिक्षकांची आता पालघर जिल्हा परिषदने बदली केल्याचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी सांगितले.
जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये १३८ शिक्षकांच्या बदल्या पालघर जिल्हा परिषदेने ठाणे जिल्ह्यात केल्याची चर्चा शिक्षक वर्गात आहे. पण ते केवळ १०३ शिक्षक असून ते आधीच यायला पाहिजे होते ते आता हजर झाले आहेत. या पालघरच्या शिक्षकाना आता शहराजवळच्या शाळा मिळणार असल्याची चर्चा देखील जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये आहे. पण त्यास मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी दुजोरा दिला नाही. सेवा जेष्ठतेसह अन्य कारणाखाली काही शिक्षकांवर अन्याय झालेला असून तो दूर करावा असे न्यायालयाने विभागीय आयुक्ताना आदेश दिले आहेत. त्यानुसार १० मे रोजी विभागीय आयुक्तांकडे या शिक्षकांची सुनावणी होईल. त्यांच्या सेवा जेष्ठतेनुसार व तक्रारीस अनुसरून त्या शिक्षकांच्या प्राधान्याने त्यांच्या आवडीच्या व जवळच्या शाळेत बदली करण्यात येईल. त्यानंतर पालघर हून आलेल्या शिक्षकांची पदस्थापना करावी लागणार असल्याचे सोनवणे यांनी लोकमतला सांगितले.