वनविभागाने साफळा रचून मांडूळाची तस्करी करणाऱ्या तीन आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 07:20 PM2019-05-07T19:20:56+5:302019-05-07T19:35:58+5:30

मांडूळाची तस्करी करण्याच्या उद्देशान या दोन मांडूळाना ठाणे शहरात आणण्यात आले होते. गाडीतून या दोन मांडूळाना कोकणातून आणण्यात आले. वन विभागाच्या पथकाने मांडूळासह दोन आरोपींना ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. या दोन आरोपीच्या सांगण्यावरून रायगड जिल्ह्यातील सुधाकर पाली येऊन एक आरोपी पकडण्यात यश मिळाले.

Three members of the gang who smuggled Mantula were stabbed by the forest department | वनविभागाने साफळा रचून मांडूळाची तस्करी करणाऱ्या तीन आरोपी जेरबंद

खारीगांव येथे दुपारी २ वाजता तस्करी करणा-या दोन आरोपींसह दोन मांडूळ हस्तगत केले

Next
ठळक मुद्देतस्करी करणा-या दोन आरोपींसह दोन मांडूळ हस्तगत गाडीतून या दोन मांडूळाना कोकणातून आणण्यात आलेरायगड जिल्ह्यातील सुधाकर पाली येऊन एक आरोपी पकडण्यात यश

ठाणे : मांडूळाची तस्करी करून ठाणे शहरात आणल्या जात असल्याची खबर मिळताच वनविभागाने साफळा रचून रविवारी खारीगांव येथे दुपारी २ वाजता तस्करी करणा-या दोन आरोपींसह दोन मांडूळ हस्तगत केले. यातील तिस-या आरोपीलाही जेरबंद करून आज ताब्यात घेण्यात आले. पोलिसांसह वन अधिकाऱ्यांव्दारे या संदर्भात कसून चौकशी सुरू आहे.
                       परदेशात कोठ्यवधी रूपयांच्या किंमतीत विकण्यासाठी या मांडूळाची तस्करी करण्यात आली. मांडूळाची तस्करी करण्याच्या उद्देशान या दोन मांडूळाना ठाणे शहरात आणण्यात आले होते. गाडीतून या दोन मांडूळाना कोकणातून आणण्यात आले. वन विभागाच्या पथकाने मांडूळासह दोन आरोपींना ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. या दोन आरोपीच्या सांगण्यावरून रायगड जिल्ह्यातील सुधाकर पाली येऊन एक आरोपी पकडण्यात यश मिळाले. या परिसरातील आदिवासी व्यक्तीने पकडलेल्या मांडळाना या आरोपींनी तस्करी करण्याच्या उद्देशाने घेतले. ठाणे शहरात येण्या आधीच त्यांना खारीगांव येथील महामार्गावर रविवारी ताब्यात घेऊन वन विभागाने कारवाई सुरू केली आहे. या संदर्भात अधिक काही माहिती मिळवण्याच्या दृष्टीने कारवाई सुरू असल्याचे वनाधिकारी व या घटनेचे तपास अधिकारी दिलीप देशमुख यांनी लोकमतला सांगितले.

 

Web Title: Three members of the gang who smuggled Mantula were stabbed by the forest department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.