४०० कर्मचाऱ्यांचे काम करतायेत १०० कर्मचारी; एसटी कर्मचाऱ्यांनी दयनीय अवस्था

By अजित मांडके | Published: March 6, 2024 02:43 PM2024-03-06T14:43:09+5:302024-03-06T14:43:18+5:30

एसटीच्या कळवा विभागीय कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांनी वाचला समस्यांचा पाढा

100 employees do the work of 400 employees; Miserable condition of ST employees | ४०० कर्मचाऱ्यांचे काम करतायेत १०० कर्मचारी; एसटी कर्मचाऱ्यांनी दयनीय अवस्था

४०० कर्मचाऱ्यांचे काम करतायेत १०० कर्मचारी; एसटी कर्मचाऱ्यांनी दयनीय अवस्था

ठाणे : एसटी महामंडळाच्या कळवा येथील विभागीय कार्यशाळेतील कर्मचारी हे आता विविध समस्यांनी ग्रासले असून या समस्यांना वाचा फोडण्यासाठी येथील कर्मचाºयांनी भाजपचे आमदार संजय केळकर यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. ४०० कर्मचाºयांचे काम हे १०० कर्मचाऱ्यांना करावे लागत आहे. आरटीओ पासींग गाड्यांची कामे तीन दिवसाऐवजी एका दिवसात करुन घेतली जात असल्याचेही त्यांनी या पत्रात नमुद केले आहे. एकूणच यातून मार्ग काढावा अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.

कळवा येथील विभागीय कार्यशाळेचे बांधकाम हे २० वर्षे जून असून पूर्वी याठिकाणी ४०० च्या आसपास कर्मचारी कार्यरत होते. परंतु २०१७ नंतर नवीन कर्मचाऱ्यांचीच भरतीच न झाल्याने ४०० कर्मचाऱ्यांचे काम १०० कर्मचाºयांना करावे लागत आहे. या ठिकाणी आरटीओ पासीगंच्या गाडयांची कामे तसेच ८ डेपोच्या गाडयांच्या रिपेअरिंगचे कामे, बॉडीची कामे, पेंटींगची कामे, तसेच इंजिन गेअरबॉक्स, क्लचप्लेट, क्रशर प्लेट, पिनीअन, जॉईंटस रेडीएटर, पाटे, वेल्डींग, अपोहस्टर खाते, इलेक्ट्रीशिअनची कामे, फ्रंट अ‍ॅक्सल ही सर्व रिपेअरिंगचे कामे जवळपास ७०० गाडयांची कामे केली जातात ही कामे करत असतांना कर्मचा-यांना अनेक समस्या भेडसावत आहेत.

आरटीओ पासिंग गाडयांची कामे ३ दिवसाचे काम एका दिवसामध्ये सक्तीने करुन घेतले जाते. नाही केल्यास प्रशासकीय दबाव टाकला जातो. म्हणजेच बदली करून चार्जशिट घेऊन पंचिंग कार्ड जमा करुन अर्धा दिवसाचा पगार कापुन अशा धमक्या देऊन कर्मचा-यांची मानसिक खराब केली जाते. हेवी वर्क असल्याने ५० टक्के कर्मचारी हे शारिरीक व्याधीनी त्रस्त आहेत. व काही कर्मचारी नोकरी सोडण्याच्या तयारीत आहेत. संपुर्ण वर्कशॉपचे बांधकाम पडण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे ९० ते १०० कर्मचा-यांचा जिव धोक्यात आहे. टॉयलेट, बाथरुम अस्वच्छ व पडक्या स्थितीत आहे व तसेच वर्कशॉपच्या आवारामध्ये साफसफाई केली जात नाही, अपघात झाल्यास प्रथमोपचार पेटी व रुग्णवाहिकेची सोय नाही. अत्याधुनिक यंत्र सामुग्री तसेच हायड्रॉलिक जाक उपलबध नाहीत.

कर्मचाऱ्यांची प्रशासकीय कामे म्हणजेच मासिक वेतन वाढ ही ६ महिने ते १ वर्ष उशिराने मिळते. तसेच मेडिकल बिलांचे क्लेम व टी.ए. बिल वेळेत मिळत नाही. कर्मचा-यांना लिव्ह बॅलेंस बद्दल माहिती लवकर मिळत नाही, कर्मचा-यांसाठी कँटिनची व्यवस्था नाही, पाण्याच्या टाक्या वेळेवर साफ होत नसल्यामुळे कर्मचारी आजारी पडण्याचे प्रमाण वाढले असल्याचेही त्यांनी या पत्रात नमुद केले आहे. कर्मचाऱ्यांनी मांडलेल्या समस्या सोडविण्यासाठी संबधीत यंत्रणेकडे पाठपुरावा केला जाईल आणि कर्मचाºयांना न्याय दिला जाईल अशी माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली.

Web Title: 100 employees do the work of 400 employees; Miserable condition of ST employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.