विशेष ट्रेनमधून अवैध प्रवास करणाऱ्या 87 प्रवाशांकडून 1 लाख 10 हजारांचा दंड वसूल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 20:44 IST2020-08-25T19:40:06+5:302020-08-25T20:44:27+5:30
कसारा मुंबई मार्गावरील घटना

विशेष ट्रेनमधून अवैध प्रवास करणाऱ्या 87 प्रवाशांकडून 1 लाख 10 हजारांचा दंड वसूल
डोंबिवली: वाराणसी मुंबई या विशेष ट्रेनमधून 106 अवैध प्रवाशांवर मध्य रेल्वेच्या वाणिज्य विभागाने मंगळवारी कारवाई केली असून त्यांच्याकडून 1 लाख 10 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
वाणिज्य विभागाचे व्हिजिलन्स राजेश झा आणि पंकज वाढे यांच्या पथकाने ही कारवाई केली असून कसारा मार्गावर ट्रेन आल्यानंतर त्यात हे पथक चढले. त्यातून त्यांनी वातानुकूलित डब्यातून 5, सेकंड क्लास मधून 82, तिकिटांच्या कोट्याचा दुरुपयोग करणाऱ्या 9, विनातिकीट प्रवास करणारे 8 आणि ई-तिकिटाची चुकीच्या पद्धतीने प्रिंट काढून प्रवास करणाऱ्या 68 अशा एकूण 106 प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. त्यापैकी 87 प्रवासी हे अवैध रित्या प्रवास करत होते असेही जनसंपर्क अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.