Wimbledon is scheduled to begin on June 29th | विम्बल्डन निर्धारित वेळापत्रकानुसार २९ जूनपासून सुरू होणार

विम्बल्डन निर्धारित वेळापत्रकानुसार २९ जूनपासून सुरू होणार

लंडन : कोरोना विषाणूच्या महामारीमुळे क्रीडा विश्व ढवळून निघाले असताना अनेक मोठ्या स्पर्धा पुढे ढकलल्या जात आहेत किंवा रद्द होत आहेत. फेंच ओपन टेनिसचे आयोजनही पुढे ढकलण्यात आले, मात्र विम्बल्डनटेनिसचे आयोजन यंदा ठरल्यानुसारच होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
निर्धारित वेळेनुसार स्पर्धा खेळविण्यास योजना आखण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली. विम्बल्डन यंदा २९ जून ते १२ जुलै या कालावधीत होईल. याआधीच वर्षातील दुसरी ग्रँडस्लॅम फ्रेच ओपन टेनिस स्पर्धाही मे ऐवजी सप्टेंबरमध्ये होणार असल्याचे या स्पर्धेच्या आयोजकांनी स्पष्ट केले होते. विम्बल्डनच्या आयोजकांना मात्र कोरोना विषाणूचा प्रकोप कमी होण्याचा आणि ही स्पर्धा सुरळीत पार पाडण्याचा विश्वास आहे. आॅल इंग्लंड लॉन टेनिस अ‍ॅण्ड क्रिकेट क्लबचे सीईओ रिचर्ड लुईस म्हणाले की, ‘आयोजनादरम्यान सार्वजनिक आरोग्याला प्राधान्य असेल. आमचे सदस्य स्टाफ व चाहत्यांचे आरोग्य, सुरक्षा याबद्दल गंभीर असून वरील सर्व गोष्टींना सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल.’ (वृत्तसंस्था)

Web Title: Wimbledon is scheduled to begin on June 29th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.