शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
3
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
4
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
5
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
6
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
7
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
8
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
9
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
10
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
11
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
12
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
13
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
14
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
15
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
16
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
17
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
18
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
19
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

Wimbledon 2018: थरथराट... जोकोव्हिचचा नदालवर 'जिगरबाज' विजय, अंतिम फेरीत धडक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 20:27 IST

राफेल नदाल आणि नोव्हाक जोकोव्हिच समोरासमोर आले आणि त्या लढतीत रोमांच नसेल तर कसे चालेल. पाच सेटपर्यंत रंगलेल्या या सामन्यात जोकोव्हिचने 6-4, 3-6, 7-6(11-9), 3-6, 10-8 असा विजय मिळवला. जवळपास सव्वापाच तास हा सामना चालला.

लंडन - राफेल नदाल आणि नोव्हाक जोकोव्हिच समोरासमोर आले आणि त्या लढतीत रोमांच नसेल तर कसे चालेल. पाच सेटपर्यंत रंगलेल्या या थरारक सामन्यात जोकोव्हिचने 6-4, 3-6, 7-6(11-9), 3-6, 10-8 असा विजय मिळवला. जवळपास सव्वापाच तास हा सामना चालला.

दुखापतीमुळे दोन वर्ष जेतेपद पटकावू न शकलेल्या जोकोव्हिचला हा दुष्काळ संपविण्याची संधी आहे. 2016 मध्ये त्याने फ्रेंच ओपनचे जेतेपद पटकावले होते आणि त्यानंतर त्याला अपेक्षेनुसार कामगिरी करता आलेली नाही. 2015 नंतर तो प्रथमच विम्बल्डनच्या अंतिम फेरीत खेळणार आहे.

केव्हीन अँडरसन आणि जॉन इस्नर यांच्यातील उपांत्य फेरीतील सामना लांबल्याने नदाल-जोकोव्हिच यांच्यातील अर्धवट राहिलेला सामना शनिवारी खेळवण्यात आला. शुक्रवारी खेळ थांबला त्यावेळी जोकोव्हिचकडे 2-1 अशी आघाडी होती आणि शनिवारी तो सहज विजय मिळवेल अशी अपेक्षा होती. मात्र, चिवट नदालने चौथ्या सेटमध्ये जोरदार मुसंडी मारली. प्रचंड चुरशीच्या आणि उत्कंठा वाढवणा-या चौथ्या सेटमध्ये नदालने तीन वेळा विम्बल्डन चषक उंचावणा-या जोकोव्हिचला घाम गाळण्यास भाग पाडले. जोकोव्हिचला प्रत्येक गुणासाठी नदालने संघर्ष करायला लावला. नदालने 1-2 अशा पिछाडीवरून 2-2 अशी बरोबरी मिळवली. त्यामुळे पाचव्या सेटची उत्सुकता अधिक वाढली. पाचव्या सेटमध्ये जोकोव्हिचने पहिला गेम घेत अडव्हांटेज घेतला. पण, नदाल हार मानण्यास तयार नव्हता. त्याने आपली सर्व ताकद पणाला लावताना सेटमध्ये  4-4 अशी बरोबरी घेतली. जोकोव्हिच थोडा थकलेला दिसत होता, परंतु तोही हार मानण्यास तयार नव्हता. प्रेक्षकांच्या कौतुकाचा स्वीकार करत दोघेही तोडीसतोड खेळत होते. पाचव्या सेटमधील 15व्या गेममध्ये नदालला जोकोव्हिची सर्व्हिस ब्रेक करण्याची संधी होती, परंतु जोकोव्हिचने त्याला संधी साधू दिली नाही. गेमच्या आकडेवारीत नदाल आणि जोकोव्हिच यांच्यात रंगलेली हा विक्रमी सामना ठरला. 

 

टॅग्स :Wimbledonविम्बल्डनTennisटेनिसSportsक्रीडा